'नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं' - पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

bjp leader pankaja munde worker on bjp parti leader : बीडच्या केज तालुक्यातील चींचपुर येथिल हनुमान मंदिरात, हनुमान चालीसा वाचन (Hanuman Chalisa) करत भाजप पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडेही या कार्यतर्त्यांनी घातल आहे. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी मुंडे समर्थकांनी दिला आहे.

bjp leader pankaja munde worker on bjp leader
'नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं' - पंकजा मुंडे समर्थक
  • पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली
  • पंकजा मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. – तृप्ती देसाई

बीड : ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही, नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं, हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा ? असा प्रश्न आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर, बीडमधील (Beed) भाजप कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. जो पाच वर्षाला पक्ष बदलतो, त्याला आमदारकी खासदारकी दिली जाते, मात्र जाणून बुजून पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप समर्थक करत आहेत.

अधिक वाचा : या गोष्टींचे चुकूनही करू नका दान, येऊ शकते मोठे आर्थिक संकट

पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली

बीडच्या केज तालुक्यातील चींचपुर येथिल हनुमान मंदिरात, हनुमान चालीसा वाचन (Hanuman Chalisa) करत भाजप पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडेही या कार्यतर्त्यांनी घातल आहे. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी मुंडे समर्थकांनी दिला आहे. तसंच यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, अचानकपणे मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

अधिक वाचा :  रविवार, १२ जून २०२२ चे राशीभविष्य, वाचा कसा जाईल आजचा दिवस 

पंकजा मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. – तृप्ती देसाई

दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील वक्तव्य केल आहे. मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. त्यांनी संघर्ष यात्रा काढली असती तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला असता. त्याचबरोबर, भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली असती तर त्यांना विरोधी पक्षनेते पदही द्यावे लागले असते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नसल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे.

अधिक वाचा : काल एमआयएमने काढलेल्या मोर्च्यातील कार्यकत्यावर गुन्हे दाखल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी