Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना विधानपरिषद न दिल्याने समर्थक नाराज, केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयावर केला हल्ला

bjp leader pankaja munde supporter try to attack bhagavat karad : पंकजा मंडे यांचे समर्थक कराड यांच्या गाडीवर हल्ला करणार असल्याची माहिती कराड समर्थकाना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे, कराड यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यावेळी कराडांच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक आले. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली.

bjp leader pankaja munde supporter try to attack bhagavat karad
केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालावर पंकजा मुंडे समर्थकांचा हल्ला   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला
  • पंकजा मुंडे समर्थकांनी कराड यांच्या कार्यायावर हल्ला केला
  • सदर घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील होते

Pankaja Munde : औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळता आहेत. दरम्यान, त्याचे पडसाद देखील आता उमटताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असलल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील होते. मात्र, पंकजा मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हा सर्व वातावरण शांत झाले.

अधिक वाचा : सत्य समोर येण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता - राठोड

पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत डावलल्यामुळे आता भाजपमध्येच संघर्ष निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंकजा मंडे यांचे समर्थक कराड यांच्या गाडीवर हल्ला करणार असल्याची माहिती कराड समर्थकाना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे, कराड यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यावेळी कराडांच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक आले. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली. त्यावेळी पोलिसांनी तातडीने पंकजा मुंडे यांच्या समर्थकाला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अधिक  वाचा : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज करा पाच व्यायाम प्रकार

पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली

बीडच्या केज तालुक्यातील चींचपुर येथिल हनुमान मंदिरात, हनुमान चालीसा वाचन (Hanuman Chalisa) करत भाजप पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडेही या कार्यतर्त्यांनी घातल आहे. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी मुंडे समर्थकांनी दिला आहे. तसंच यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, अचानकपणे मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

अधिक वाचा : हे सेलिब्रिटी वेबसीरिज, सिनेमासाठी घेतात भरपूर रक्कम 

पंकजा मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. – तृप्ती देसाई

दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील वक्तव्य केल आहे. मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. त्यांनी संघर्ष यात्रा काढली असती तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला असता. त्याचबरोबर, भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली असती तर त्यांना विरोधी पक्षनेते पदही द्यावे लागले असते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नसल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी