उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर सिल्वर ओक या घरावर एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला करत दगडफेक आणि चपला देखील भिरकावल्या असल्याची घटना घडली आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी पवार यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या शेकडो लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पवार यांच्या घरावर झालेल्या दगफेकीनंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जाऊ लागला आहे.
दरम्यान, पूर्वी पवार कुटुंबाचे खंदे समर्थक असणारे आणि सध्या बीजेपीत असणारे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. कोणतीही समस्या संविधानिक पद्धतीने सोडविली जाऊ शकते, इतके आपले संविधान सक्षम आहे. असं पाटील यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : मैत्रिणींला धोका मिळताच 6 मैत्रिणींनी विष केलं प्राशन
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मिडियावरती एक पोस्ट करत पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, निषेध..! मा.शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी घडलेली घटना ही असमर्थनीय व निंदनीय आहे. कोणतीही समस्या संविधानिक पद्धतीने सोडविली जाऊ शकते, इतके आपले संविधान सक्षम आहे. घरावर केलेले आंदोलन निषेधार्हच.. अशी पोस्ट आमदार पाटील यांनी केली आहे.
अधिक वाचा : Kulgam Anantnag Encounter : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार
अधिक वाचा : आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल
घराबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर काय म्हणाले शरद पवार?