भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा फोटो राष्ट्रवादीच्या जाहिरातीत

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 01, 2020 | 14:11 IST

A photo of BJP MLA Rana Jagjit Singh Patil flashed in the NCP advertisement.राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते विनायक बगदुरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या जाहिराती मध्ये सदर फोटो जाहिरातीच्या स्वरूपात छापून आला आहे.

BJP MLA Rana Jagjit Singh Patil again on Pawar's side.
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीच्या जाहिरातीत   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादीच्या जाहिरातीत भाजपा आमदार झळकले
  • ईद निम्मित दिली होती जाहिरात
  • सदर जाहिरातीमुळे चर्चांना उधाण

लातूर: राजकारणात कधी काही होईल ते सांगता येत नाही. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीत (bjp) प्रवेश केलेल्या राणाजगजितसिंह पाटील (ranajagajitsinh patil) यांचा फोटो शरद पवार (sharad pawar) यांच्यासोबत झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या फोटोत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (ncp)बरेच नेते मंडळी दिसत असून, पाटील कुटुंबातील सदस्य देखील या फोटोमध्ये असल्याने चर्चेला मात्र उधाण आले आहे.

ईदच्या शुभेच्छा देणारी जाहिरात

दरम्यान सदर फोटो हा बकरी ईदच्या (bakari eid) निमित्ताने एका दैनिकात जाहिरातीसाठी दिला गेला होता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विनायक बगदुरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या जाहिरातीमध्ये सदर फोटो जाहिरातीच्या स्वरूपात छापून आला आहे. मात्र सदर फोटोमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या तुळजापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील अचानक राष्ट्रवादीच्या जाहिरातीत झळकले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नेमक प्रकरण काय?

कॉंग्रेस चे नेते विनायक बगदुरे यांनी जाहिरात एका दैनिकाला दिली होती. आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांनी सदर प्रकार विनायक बगदुरे यांना विचारले असता ते म्हणाले, सदर दैनिकाने छापलेली जाहिरात हि चुकीची आहे. मी त्यांना दुसरी जाहिरात छापायला दिली होती. मात्र त्यांनी चुकीची छापली आहे. मात्र यामागे दुसरा कुठलाही उद्देश नाही.

अजित पवारांनाही शुभेच्छा दिल्याने चर्चा?

दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून अजित पवार (ajit pawar) आणि त्यांचा एकत्रित असलेला फोटो शेअर केला होता. दरम्यान राणा जगजितसिंह पाटील यांनी फोटो शेअर करताच जिल्ह्यात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या.

जनसामान्यांच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे एक आदर्श नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा...

Posted by Ranajagjitsinha Patil on Tuesday, 21 July 2020

काय म्हटले होते पोस्टमध्ये

आमदार पाटील यांनी अजित पवारांचा फोटो शेअर करत म्हटले होतं, जनसामान्यांच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे एक आदर्श नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार. प्रत्येक विषयाची आणि जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण, प्रचंड लोकसंग्रह, सर्वसमावेशकता, कोणत्याही प्रश्‍नांवर कौशल्याने मार्ग काढण्याची हातोटी हे त्यांचे गुण प्रत्येकाने घ्यावे असेच आहेत. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नातेवाईक असल्याने शुभेच्छा दिल्या

याविषयी राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले होते की, अजित पवार हे आमचे नातेवाईक आहेत. राजकारण आणि नातेसंबंध हे वेगळे असतात. पाटील पुढे बोलताना  म्हणाले होते, मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादीत येण्याचा मुद्दा खोडून काढला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी