भाजपच्या ‘या’ आमदाराने पुन्हा ‘शरद पवारांना डिवचलं’

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jul 12, 2020 | 10:20 IST

BJP MLA Sujit Singh Thakur criticized on Sharad Pawar: शरद पवार यांनी दिलेल्या संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखती नंतर भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पवारांना डिवचले आहे. काय म्हणाले ठाकूर पाहूया

BJP MLA Sujit Singh Thakur criticized on  Sharad Pawar
भाजपच्या ‘या’ आमदाराने पुन्हा ‘शरद पवारांना डिवचल’  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • संजय राऊत यांनी तब्बल अडीच तास पवारांची मॅरेथॉन मुलाखत घेतली
  • मुलाखतीत अनेक गौप्यस्फोटावर प्रश्न
  • आपल्या पक्षाने शंभरी पार केली नाही- सुजितसिंह ठाकूर

उस्मानाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी तब्बल अडीच तास मॅरेथॉन मुलाखत घेतली असून, राऊत यांनी अचूक वेळ साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra  fadanvis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले. दरम्यान, संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील पवार यांनी त्यांच्या खास शैलीत दिली आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी एक खोचक प्रश्न विचारला कि, आपण आघाडी सरकारचे हेडमास्तर आहात कि रिमोट कंट्रोल या प्रश्नावर पवारांनी दोघापैकी कोणीही नसल्याचे उत्तर दिले आहे. सध्या संजय राऊत यांनी घेतलेली पवारांची मुलाखत चर्चेचा विषय बनली असून, या मुलाखतीनंतर भाजपचे विधानपरिषदेचे (vidhan parishad) आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मात्र पवारांना डिवचलं आहे.

काय म्हणाले सुजितसिंह ठाकूर?

आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, सध्या एक शरद, बाकी गारद! या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पार्टीची अधिक काळजी करण्यापेक्षा त्यांना भारतीय जनता पार्टीची आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची अधिक काळजी आहे. असं दिसून येत आहे. त्याचबरोबर शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत किवा इतर कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, हा देखील प्रश्न त्यातून निर्माण होत आहे.

आपल्या पक्षाने शंभरी पार केली नाही- सुजितसिंह ठाकूर

दरम्यान, ठाकूर यांनी पुढे म्हटलं आहे कि, पवार हे भाजपाच्या निवडून आलेल्या संख्येबद्दल बोलले आहेत. तर पवार यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकदाही आपले स्वबळावर सरकार आणता आलेलं नसून आपल्या पक्षाने कधीच आमदारांची शंभरी पार केली नाही. खासदार तर एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निवडून येतात. असं ठाकूर म्हणाले आहेत.

अनैसर्गिक सरकार जन्माला घातलं

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकदा नव्हे तर दोनदा शंभराहून अधिक आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करून, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला होता. म्हणून महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनादेश दिला होता. मात्र जनादेशाचा अनादर करून, महाराष्ट्रात अनैसर्गिक सरकार जन्माला घातलं आहे.ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या ते सोबत आले हा देखील जनादेशाचा अपमान आहे असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा नाही- पवार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केलेल्या सर्व आरोपांवर शरद पवार यांनी उत्तरे दिली आहेत. पवार यांनी म्हटलं आहे कि, सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चेत किवा निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहित नाही अस देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी