महाविकास आघाडीतील 'शिव' नाव वगळण्यात आल्यामुळे त्यांच्यात 'राम' कसा राहील ? BJP च्या आमदारांचा सरकारवर जोरदार निशाणा

bjp mla targeted mahavikas aghadi goverment : शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत ७/१२ कोरा करू, चिंतामुक्त शेतकरी करू असे म्हणणारे प्रत्यक्षात कृतीतून हे दाखवतायेत का? वीज बिल वसुली पोटी पिकास पाणी आवश्यक असतांना वीज तोडणारे सरकार खरेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का? असे अनेक प्रश्न गेली दोन वर्ष अनुत्तरित आहेत. - आमदार पाटील

bjp mla targeted mahavikas aghadi goverment
'शिव' नाव वगळण्यात आल्यामुळे त्यांच्यात 'राम' कसा राहील ?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जे 'शिव' हे नावच वगळतात त्यांच्याकडून आपण न्याय मिळण्याची अपेक्षा काय ठेवायची
  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प शिवसेनाने प्रलंबित ठेवले
  • राज्यातील शेतकरी महाविकास आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे जास्त चिंताग्रस्त झाला आहे.

BJP on mahavikas aghadi goverment | उस्मानाबाद : शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असताना 'महा शिव विकास आघाडी' हे नाव गटबंधनाला देण्याचे ठरले होते. त्यात बदल करत 'शिव' वगळण्यात आल्यामुळे आता त्यांच्यात 'राम' कसा राहील ? असा सवाल तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले उपस्थित केला आहे.  जे 'शिव' हे नावच वगळतात त्यांच्याकडून आपण न्याय मिळण्याची अपेक्षा काय ठेवायची! असा निशाणा देखील पाटील यांनी साधला आहे.

पाटील यांनी उपस्थित केले सवाल?

ज्यांना 'शिव' या शब्दाची अडचण वाटते असे लोक मराठा आरक्षण मिळू देतील का? ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करतील का? तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजास उपलब्ध करून दिलेल्या सुविधा पुढे चालू ठेवतील का? अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुढे मदत करतील का? निवडणुकीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रु. २५००० ते ५०००० मदत द्या म्हणणारे आज मुख्यमंत्री आहेत, ते खरंच शेतकऱ्यांना मदत करत आहेत का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील शेतकरी महाविकास आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे जास्त चिंताग्रस्त झाला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत ७/१२ कोरा करू, चिंतामुक्त शेतकरी करू असे म्हणणारे प्रत्यक्षात कृतीतून हे दाखवतायेत का? वीज बिल वसुली पोटी पिकास पाणी आवश्यक असतांना वीज तोडणारे सरकार खरेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का? असे अनेक प्रश्न गेली दोन वर्ष अनुत्तरित आहेत. आज राज्यातील शेतकरी महाविकास आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे जास्त चिंताग्रस्त झाला आहे. असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी बोलताना केले. 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प शिवसेनाने प्रलंबित ठेवले

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे, टेकनिकल टेक्सटाईल पार्क यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प शिवसेनाने प्रलंबित ठेवले आहेत. याउलट देशातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी वेगवेगळ्या स्वरूपात केला आहे. कोरोना काळात आत्मनिर्भर भारत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, मोफत रेशन या सारख्या अनेक जणकल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचत आहे. या योजनांचा लाभ शेवटच्या अडचणीत असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची जिम्मेदारी ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे असे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी