लातूर : लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. श्रृंगारे यांनी आपण दलित असल्याममुळे मला सापत्न वागणूक मिळत असल्याचं म्हटलं आहे. खासदारानेच असं धक्कादायक वक्तव्य केल्याने मोठीब खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या समोर केलं आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर बोलताना ही खंत व्यक्त केली आहे.
अधिक वाचा : बदला घेण्यासाठी प्रियकराच्या मदतीने काढला मैत्रिणीचा काटा
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांमध्ये सापत्न पणाची वागणूक मिळत आहे. अधिकारी ऐकत नाहीत, हे मी दलित उपेक्षित असल्यामुळे होत असल्याची खंत लातूरचे खासदर सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अधिकारी देखील प्रोटोकालनुसार शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण ही देत नाहीत. केलेल्या कामाचे श्रेय मिळत तर नाहीच. प्रस्थापित ते श्रेय मिळू देत नाहीत. तर माझ्या कामाचे श्रेय ही प्रस्थापित घेतात. असंही खासदार श्रृंगारे यांनी म्हटलं आहे. यावेळी, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची देखील उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 'स्टॅच्यु ऑफ नॉलेज' या ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदर सुधाकर श्रृंगारे यांनी बोलताना खंत व्यक्त केली.
अधिक वाचा : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस आहे खूप
केवळ मी दलित असल्यामुळेच मला अशी वागणूक दिली जात असल्याचं खासदार सुधाकर शृंगारे यांनी म्हटल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या घटनेची नोंद घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मागील चार वर्षांपासून मी खासदार असलो तरी येथील प्रशासनाच्या वतीने मला कधीही सन्मानाने बोलावले जात नाही. मला निमंत्रण दिले जात नाही, असं ते म्हणाले. पुढे बोलताना शृंगारे म्हणाले की, ७० फूट उंच या प्रतिकृतीचे काम सुरू करण्यात आल्यानंतर दोनच दिवसात हे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून बंद पाडल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला
सदर प्रकरणाची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयाची गंभीर दखल घेत म्हटलं आहे की, लातूरच्या प्रशासनातील दखल घेतली जाईल. एवढे नव्हे तर हा विषय पंतप्रधान मोदी यांच्या समोर ठेवण्यातय येईल असं देखील जाहीर सभेत सांगितले आहे.