MLC Election : चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे पत्ता कट? या महिला नेत्याची उमेदवारी निश्चित

BJP rejects Pankaja Munde's candidature : दोन दिवसापासून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अचानकपणे पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असल्याची माहिती टाइम्स नाऊ मराठीचा हाती लागली आहे.

BJP rejects Pankaja Munde's candidature
चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे पत्ता कट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारली
  • उमा खापरे यांची जवळपास उमेदवारी निश्चित
  • चित्रा वाघ यांनाही भाजपने दिली नाही संधी

MLC Election : मुंबई : विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी घडामोडींना आता वेग आला आहे. दोन दिवसापासून सतत चर्चेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पंकजा मुंडे आणि भारतीय जनता पार्टीच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांनाही भाजपने मोठा धक्का दिला आहे.

उमा खापरे यांना देण्यात आली संधी?

दोन दिवसापासून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अचानकपणे पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असल्याची माहिती टाइम्स नाऊ मराठीचा हाती लागली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती मात्र त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली नसून उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये, प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे . ही नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.  

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम? 

  1.  ०९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत
  2.  १० जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल
  3. १३ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
  4. २० जून रोजी मतदान पार पडेल.
  5. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.
  6. २० जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.
  7.  २० जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी