तुळजापूर मंदिराची Bogus website प्रकरण: अखेर ४ वेबसाईटवर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल, आतापर्यंत अनेकांना गंडा

online fraud fake tuljapur mandir website fir filed : आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने ज्या भक्तांनी यासह अन्य बोगस वेबसाईटवर दिलेल्या आमिषाला बळी पडून पुजा व विधीसाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा असे करण्यात आले आहे.

Bogus website case of Tuljapur temple
४ वेबसाईटवर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट
  • तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम ४२० फसवणुक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६ सी व डी नुसार गुन्हा नोंद
  • मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात घोटाळा होणे किंवा लुट होणे ही काय नवीन गोष्ट नाही. मात्र, यावेळी झालेला घोटाळा ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र, तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची विविध पुजा करण्याच्या नावाने आर्थिक लुट करणाऱ्या ४ वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम ४२० फसवणुक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६ सी व डी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. online fraud fake tuljapur mandir website fir filed 

भाविकांना करण्यात आले हे आवाहन

आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने ज्या भक्तांनी यासह अन्य बोगस वेबसाईटवर दिलेल्या आमिषाला बळी पडून पुजा व विधीसाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा असे करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे निवेदनात?

माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे. मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे. 

मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत

मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे. या वेबसाइटवर कुणाचाही नंबर नाही. तर, वेबसाइटवर क्लिक केले असता  पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण - नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी