9 जणांचे प्राण वाचवताना 65 टक्के भाजलेल्या अजहर शेखचा सर्व खर्च लातूर कॉंग्रेस करणार, अमित देशमुखांनी दिल्या सूचना

boy rescued 9 passenger from st bus in horrifying fire incident ; अजहर शेख असं लोकांचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. एसटी बसला आग लागल्यावर त्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घाबरुन न जाता हिंमत दाखवली. अजहर शेख या तरुणाने लाथ मारुन एसटी बसची पाठीमागील काच फोडली. त्यानंतर आप्तकालीन खिडकून एसटी बसमधील 9 प्रवाशांना अजहर याने बाहेर काढलं

boy rescued 9 passenger from st bus in horrifying fire incident
65 टक्के भाजलेल्या अजहर शेखचा सर्व खर्च लातूर कॉंग्रेस करणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • का तरुणाने 9 प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला
  • तरुणाने लाथ मारुन एसटी बसची पाठीमागील काच फोडली
  • मात्र, या घटनेत अजहर शेख नावाचा तरुण 65 टक्के भाजला गेला आहे

लातूर : लातूर : लातूर – नांदेड रस्त्यावरती घडलेल्या एका अपघातात 9 जणांचे प्राण वाचवणारा अजहर शेख हा युवक गंभीर भाजला गेला आहे. अजहर शेख वर सध्या लातूर येथील लहाने हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु  आहेत. शेख हा 65 टक्के भाजला गेला असून, त्याच्यावर होणाऱ्या उपचाराचा खर्च देखील मोठा आहे. दरम्यान, अजहरवर होणाऱ्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी ही राज्याचे माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतली आहे अशी माहिती लातूर शहर जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे. भातखेडा जवळ झालेल्या अपघातात टॅंकरने पेट घेतल्यानंतर जवळच असलेल्या एसटी बसने देखील पेट घेतला होता. बसमध्ये अडकलेले नऊ प्रवाश्यांची  सुखरूपपणे अजहर शेख या तरुणाने सुटका केली होती. मात्र यावेळी अजहर शेख हा होरपळला गेला होता.

नेमके काय घडले?

भीषण अपघातानंतर नांदेडहून लातूरला जाणाऱ्या एका एसटी बसलाही आग लागली होती. यावेळी जिगरबाज तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल 9 प्रवाश्यांचा जीव वाचवला आहे. लातूर-नांदेड महामार्गावर डिझेल टँकरने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला होता. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. मात्र ही घटना इतकी भयंकर होती, की या अपघातानंतर महामार्गावरुन जाणाऱ्या एकूण 7 वाहनं जळून खाक झाली आहेत.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

तरुणाने लाथ मारुन एसटी बसची पाठीमागील काच फोडली

मिळालेल्या माहितीनुसार, अजहर शेख असं लोकांचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. एसटी बसला आग लागल्यावर त्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घाबरुन न जाता हिंमत दाखवली. अजहर शेख या तरुणाने लाथ मारुन एसटी बसची पाठीमागील काच फोडली. त्यानंतर आप्तकालीन खिडकून एसटी बसमधील 9 प्रवाशांना अजहर याने बाहेर काढलं आणि त्यांना वाचवलं आहे. पण दुसऱ्यांना वाचवत असताना त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. अजहर स्वतः आगीत 65 टक्के होरपळला आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. अजहर हा मूळचा शिरुर ताजबंद येथील असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक वाचा ; गिल,धवन,अय्यरची तुफानी खेळी, न्यूझीलंडला हव्यात इतक्या धावा

आग लागलेल्या एसटी बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते

लातूरहून निघालेला डिझेलचा टँकर अहमदपूरच्य दिशेने निघाला होता. त्यादरम्यान, या भरधाव टँकरने ऊस ट्रॉलीला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की यानंतर स्फोट झाला. स्फोटानंतर डिझेल टँकरने पेट घेतला. त्यानंतर एसटी बसने देखील पेट घेतला. पेट घेतलेली एसटी बस ही नांदेडहून लातूरच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते. यापैकी 9 प्रवाशांचा जीव वाचण्यात अजहर याला यश आलं. तर 6 प्रवासी जखमी झाले. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक वाचा ; बायका 'हे' काम करत असतील पुरुषांनी लगेच फिरवावेत आपले डोळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी