खड्ड्यात गाडी आदळली आणि थेट छातीत रायफलची गोळी घुसली, जवानाचा मृत्यू

bullet fired from a rifle killing an armed soldier : प्पाला भानूप्रसाद असं मृत जवानाच नाव आहे. त्याचं वय ३५ वर्षे आहे. जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमध्ये पप्पाला भानूप्रसाद हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

bullet fired from a rifle killing an armed soldier
खड्ड्यात गाडी आदळली आणि थेट छातीत रायफलची गोळी घुसली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हादऱ्यांमुळे जवानाच्या हातातील रायफलची गोळी सुटून ती थेट त्याच्या छातीत घुसली
  • हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमध्ये पप्पाला भानूप्रसाद हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते
  • खड्ड्यात गाडी आदळल्याने जवानाच्या ‘इंसास रायफल’ मधून गोळी सुटली

bullet fired from a rifle killing an armed soldier हिंगोली : पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावल्याच देखील समोर आलं आहे. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक विचित्र घटना घडल्याच समोर आलं असून, या घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला आहे. एका कामासाठी गाडीतून प्रवास करत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीला हादरे बसले. या हादऱ्यांमुळे जवानाच्या हातातील रायफलची गोळी सुटून ती थेट त्याच्या छातीत घुसली आणि येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमधील एका कॉन्स्टेबलचा अत्यंत दुर्दैवी (Death of constable) असा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली असून, घटना घडल्यानंतर जवानाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी जवानाला तपासून मृत घोषित केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमध्ये पप्पाला भानूप्रसाद हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते

पप्पाला भानूप्रसाद असं मृत जवानाच नाव आहे. त्याचं वय ३५ वर्षे आहे. जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमध्ये पप्पाला भानूप्रसाद हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पप्पाला भानूप्रसाद हे मूळ आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना हा अपघात घडला असून, त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. 

खड्ड्यात गाडी आदळल्याने जवानाच्या ‘इंसास रायफल’ मधून गोळी सुटली

चालक आणि जवान गाडीतून जात असताना डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. डोंगरकडापासून तीन किमी अंतरावर ही घटना घडली. रस्त्याचे काम सुरु असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने जवानाच्या ‘इंसास रायफल’ मधून गोळी सुटली. ती थेट जवानाच्या छातीत घुसली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पप्पाला भानूप्रसाद हे पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास डिपार्टमेंटच्या गाडीत हैदराबादहून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी नांदेडकडे रवाना झाले होते. मात्र, अचानकपणे हा प्रकार घडला. पप्पाला भानूप्रसाद यांना गोळी लागल्यावर तात्काळ त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी