महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात सुरु होणार बस सेवा!

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 09, 2020 | 15:56 IST

या सर्व बस जिल्हा अंतर्गत वाहतूक करणार आहेत. जिल्ह्याच्या सीमा बाहेर बस वाहतूक करता येणार नाही. बसचा प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्केच क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असेल.

Bus service to be started in this district of Maharashtra
महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात सुरु होणार बस सेवा!  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • उस्मानाबाद आगारातून उस्मानाबाद ते उमरगा सकाळी ८ वाजता बस निघेल
  • बाजारपेठाही दररोज उघडण्यात येणार होत्या मात्र
  • जिल्हा अंतर्गत असेल बस सेवा

उस्मानाबाद: गेल्या अनेक दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे कोरोना संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती नाही. त्यामुळे जिल्यात ११ मे पासून बस सेवा सुरू करण्यात येत आहे. लॉकडाऊन च्या काळात बंद असलेली बस सेवा सुरू होण्यासाठी काही अटी देखील घालून दिल्या आहेत. उस्मानाबाद, उमरगा, कळंब, तुळजापूर व परांडा या आगारातून प्रत्येकी २ तर भूम आगारातून एका मार्गावर बस निघेल.

असा असेल वेळ

उस्मानाबाद आगारातून उस्मानाबाद ते उमरगा सकाळी ८ वाजता बस निघेल. तर दुपारी ३ वाजता उमरगा येथून निघेल. उस्मानाबाद येथून कळंबला जाण्यासाठी उस्मानाबाद कळंब ही बस सकाळी ९ वाजता निघेल. तर ती बस ४ वाजता कळंब येथून उस्मानाबादसाठी परत निघेल. उमरगा आगारातून उमरगा उस्मानाबाद बस सकाळी आठ वाजता निघेल. उमरगा लोहारा सकाळी ९ वाजता निघेल. तर दुपारी ३ वाजता लोहाराहून उमरगासाठी निघेल.

भूम ते उस्मानाबाद जाण्यासाठी अशी असेल बसची वेळ

भूम आगारातून भूम उस्मानाबाद ही बस सकाळी ९ वाजता उस्मानाबादसाठी निघणार आहे. तसेच उस्मानाबाद हून भूम येथे जाण्यासाठी उस्मानाबाद आगारातून ती बस सायंकाळी ५ वाजता निघेल.

तुळजापूर आगाराची अशी असेल वेळ

तुळजापूर आगारातून तुळजापूर उस्मानाबाद ही बस सकाळी ९ वाजता व सायंकाळी ४ वाजता निघेल. तर उस्मानाबादहून तुळजापुरला जाण्यासाठी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता निघेल.

कळंब ते उस्मानाबाद

कळंब आगारातून कळंब उस्मानाबाद ही बस सकाळी ८ वाजता निघून सायंकाळी ५ वाजता उस्मानाबादहून कळंबसाठी निघेल. तर कळंब येरमाळा ही बस सकाळी ९ वाजता निघून सायंकाळी ५ वाजता परतीसाठी निघेल.

परंडा आगाराची वेळ

परांडा आगारातून परांडा भुम उस्मानाबाद ही बस सकाळी ७ वाजता निघून सायंकाळी ४ वाजता उस्मानाबाद परांडासाठी निघेल. तर परांडा पाथरूड बस सकाळी ९ वाजता निघून सायंकाळी ४ वाजता पाथरूड येथून परांड्यासाठी निघेल.

यांना प्रवास करता येणार नाही

६५ वर्षाखालील व्यक्ती, दुर्धर आजार असलेली व्यक्ती, गरोदर स्त्रिया, १० वर्षाखालील मुले यांना बसमधून प्रवास करता येणार नाही.

जिल्हा अंतर्गत असेल बस सेवा

या सर्व बस जिल्हा अंतर्गत वाहतूक करणार आहेत. जिल्ह्याच्या सीमा बाहेर बस वाहतूक करता येणार नाही. बसचा प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्केच क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असेल.

बाजारपेठाही दररोज उघडण्यात येणार होत्या मात्र

दरम्यान लोकांना खरेदी करण्यासाठी प्रशासनाने बाजारपेठा सुरू केल्या होत्या. मात्र लोकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दुकाने हे देखील खुली केली होती. मात्र नागरिकांनी नियमावर हरताळ फासला. शहरातील मारवाडी गल्ली, सराफ गल्ली, बार्शी नाका परिसर, बस स्टँड, नेहरू चौक, समता कॉलनीसह शहरातील विविध ठिकाणी मोठी गर्दी केली होती. काही अपवाद वगळता सुरक्षित अंतराचा तसेच मास्क लावण्याच्या नियमांचे पालन ही झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी असल्याने प्रशासन यावर विचार करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी