अंत्यविधीची राख चोरणारी टोळी गजाआड, 'या' कारणासाठी स्मशानातील राख चोरत असल्याची चर्चा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 24, 2021 | 18:16 IST

Cemetery ashes thefting gang arrested : ग्रामस्थांनी पकडलेले लोक माढा तालुक्यातील बारलोणी येथील असल्याचे उघड झाले आहे. राख चोरणाऱ्या टोळीत ४ जणांचा समावेश होता. मात्र, यापैकी दोन जणांना पकडण्यात ग्रामस्थांना यश

Cemetery ashes thefting gang arrested
अंत्यविधीची राख चोरणारी टोळी गजाआड, 'या' कारणासाठी राख चोरत असल्याची चर्चा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • प्रसुती वेळी गोंडस बाळाला जन्म दिल्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली
  • ग्रामस्थांनी दोन जणांना राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडून चोप दिला
  • एक महिला व एक पुरुषाचा समावेश

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. पारधी समाजातील एका महिलेला चारीत्र्येच्या संशय घेत तिच्याच पतीने उकळत्या तेलात हात घालायला लावल्याची घटना घडली होती. दरम्यान, आता उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. परंडा तालुक्यातील देवगाव (खुर्द )  येथील स्मशानभुमीतून (Cemetery) चक्क मयत बाळंतीण महिलेची अत्यविधीनंतर राख (ashes) चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पकडली आहे. दरम्यान, या टोळीला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात केले आहे. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ जणांना अटक केली आहे तर २ जण फरार आहेत.

प्रसुती वेळी गोंडस बाळाला जन्म दिल्यावर मृत्यू 

बाळंतीण महिलेवर २२ फेब्रुवारी रोजी  स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंडा तालुक्यातील देवगाव (खुर्द) येथे एका महिलेचा प्रसुती वेळी गोंडस बाळाला जन्म दिल्यावर सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

ग्रामस्थांनी दोन जणांना राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडून चोप दिला

दरम्यान, मिळालेली माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी देहुगाव येथे स्मशानभुमीत चार जण त्या महिलेची राख भरत असल्याचा प्रकार घडत होता. हा प्रकार गावातील ग्रामस्थांनी पाहिला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. दरम्यान, ग्रामस्थांनी स्मशानभुमीच्या दिशेने धावत आले. त्यावेळी, ग्रामस्थांनी दोन जणांना राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

एक महिला व एक पुरुषाचा समावेश

दरम्यान, सदर प्रकार हा जादूटोणा करण्यासाठी केला असल्याची घटनास्थळी चर्चा सुरु होती. मात्र नेमका हा प्रकार कशामुळे केला आहे ते पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामस्थांनी पकडलेले लोक माढा तालुक्यातील बारलोणी येथील असल्याचे उघड झाले आहे. राख चोरणारी टोळीत चार जणांचा समावेश होता. मात्र, यापैकी दोन जणांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले असून, यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश आहे तर दोन जण ग्रामस्थांच्या तावडीतून पळून गेले आहेत. 

या कलामअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

दरम्यान, सदर प्रकारानंतर परंडा पोलीस ठाण्यात कलम २९७ , ३७९ , ५११  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी