कार्यालयावर हल्ला झाल्यावर भागवत कराड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले तो कार्यकर्ता पंकजा मुंडे यांचा नाही तर.....

central minister bhagavat karad on aurangabd police : माझ्या कार्यालयावर हल्ला होणार असल्याची माहिती मला अगोदर मिळाली होती. मी काल गोव्यामध्ये असताना सचिन डोईफोडे नावाचा तरुण माझ्या कार्यालयावर हल्ला करणार असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यांनतर मी तात्काळ दराडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्यांनतर विमानतळावर उतरल्यावर कार्यालयासमोर काही तरी हाणामारी झाली असल्याची माहिती मला मिळाली असल्याचं कराड यांनी म्हटलं आहे

central minister bhagavat karad on aurangabd police
कार्यालयावर हल्ला झाल्यावर भागवत कराड यांची पहिली प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कालच्या हल्ल्यात पोलिसांचे दुर्लक्ष झालं असल्याचा थेट आरोप कराड यांनी केला
  • माझं कार्यालय फोडायला येणार आहेत हे सांगून देखील पोलिसांनी दुर्लक्ष केलं
  • हल्ला करणारा पंकजा मुंडे यांचा समर्थक नाही – भागवत कराड

औरंगाबाद  : रविवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नसल्याने मुंडे समर्थकांनी भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कराड यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या हल्ल्यात पोलिसांचे दुर्लक्ष झालं असल्याचा थेट आरोप कराड यांनी केला आहे. माझं कार्यालय फोडायला येणार आहेत हे सांगून देखील पोलिसांनी त्या व्यक्तीला अगोदर ताब्यात घेतले नाही. त्यामुळे सदर घटना घडली असल्याचं कराड यांनी बोलून दाखवले.

अधिक वाचा : सूर्यदेवाला अर्घ्य देताना घ्या या गोष्टींची विशेष काळजी

नेमकं काय म्हणाले भागवत कराड?

माझ्या कार्यालयावर हल्ला होणार असल्याची माहिती मला अगोदर मिळाली होती. मी काल गोव्यामध्ये असताना सचिन डोईफोडे नावाचा तरुण माझ्या कार्यालयावर हल्ला करणार असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यांनतर मी तात्काळ दराडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्यांनतर विमानतळावर उतरल्यावर कार्यालयासमोर काही तरी हाणामारी झाली असल्याची माहिती मला मिळाली असल्याचं कराड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांना सांगून सुद्धा पोलिसांचे दुर्लक्ष झाले आणि कार्यालयावर हल्ला झाला असं कराड म्हणाले.

अधिक वाचा : ...म्हणून महिलांच्या शर्टचे बटण डावीकडे असते

पोलीस असं का करत आहेत याचं मला संशय येतोय – कराड

दरम्यान, पुढे बोलताना कराड म्हणाले की, माझं कार्यालय फोडायला येत असल्याचं सांगतोय तरीही पोलीस लक्ष घालत नाही. पोलीस असं का करत आहेत याचं मला संशय येत असल्याच कराड म्हणाले. माझा कार्यालयावर ज्या तरुणाने हल्ला केला त्याच तरुणाने तीन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला केला होता आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता. आता सुद्धा एक-दोन वेळा सांगून सुद्धा त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. त्यामुळे रात्री पोलीस आयुक्त यांना बोललो असून, आजही बोलणार असल्याच कराड यांनी बोलताना म्हटलं आहे.

अधिक वाचा : पाणी साठवण्यासाठी का वापरतात तांब्याची भांडी? 

हल्ला करणारा पंकजा मुंडे यांचा समर्थक नाही – भागवत कराड

हल्ला करणारा तरुण हा बाळासाहेब सानप यांच्या भगवान महासंघाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे सानप यांना सुद्धा मी बोललो असून, आज त्याची हकालपट्टी करणार असल्याच सानप मला म्हणाल्याचं कराड म्हटले आहे. दरम्यान, कराड म्हणाले की, माझ्या कार्यालवर हल्ला करण्यासाठी आलेला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, तसेच पंकजा मुंडे यांचा सुद्धा समर्थक नाही. असंही कराड यांनी स्पष्ट केलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी