Bhagwat Karad : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाबाबत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं मोठ वक्तव्य म्हणाले....

central minister bhagavat karad on shivsena leader chandrakant khaire : कोणत्याही शहराचे नाव बदलायचे असेल तर नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्याच्या विधानसभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. कारण, शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते आदी - खात्यांची ना हरकत लागते. परंतु माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही. काही जण केवळ हवेत बाता मारत असल्याचं देखील भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

central minister bhagavat karad on shivsena leader chandrakant khaire
नामांतराच्या प्रस्तावाबाबत भागवत कराड यांचं मोठ वक्तव्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही - भागवत कराड
  • मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काही मंडळी चुकीची माहिती देत असावी – भागवत कराड
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानीच ८ मे १९८८ रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्याचे माजी खासदार तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) याची घोषणा करतील असा दावा केला होता. मात्र, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते भागवत कराड (bhagwat karad) यांनी खैरे यांनी केलेल्या दाव्याची हवाचं काढली आहे. कराड म्हणाले की, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही, असे कराड म्हणाले आहेत. त्यामुळे, खैरे यांनी केलेला दावा हा खोटा की खरा अशी चर्चा सुरु झाली आहे.

अधिक वाचा : यंत्रणाच नसल्याने अफगाणिस्तानच्या जंगलात पसरत चाललाय वणवा

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काही मंडळी चुकीची माहिती देत असावी – भागवत कराड

दरम्यान, भागवत कराड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काही मंडळी चुकीची माहिती देत असावी. कारण, एखाद्या शहराचे नाव बदलायचे असेल तर मोठी प्रक्रिया करावी लागते. कोणत्याही शहराचे नाव बदलायचे असेल तर नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्याच्या विधानसभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. कारण, शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते आदी - खात्यांची ना हरकत लागते. परंतु माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही. काही जण केवळ हवेत बाता मारत असल्याचं देखील भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : ४० वर्षांत हिमालयातील ग्लेशियर ३.९ लाख हेक्टरने झाले कमी 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानीच ८ मे १९८८ रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया कधी पूर्ण होणार अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या भाषणात सांगितले की, हो आम्ही म्हणतोच संभाजीनगर आणि आहेच संभाजीनगर. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानीच ८ मे १९८८ रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे. असं चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आपण संभाजीनगर म्हणतो, पण काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला अधिकृतरीत्या कधी करणार. मात्र उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली असून, ते कधीपण जाहीर करतील असं खैरे म्हणाले होते. मात्र, खैरे यांनी केलेल्या दाव्याची हवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी काढून घेतल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे नाव बदलणार की नाही याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

अधिक वाचा : पीएम किसानसाठीची eKYC मुदत सरकारने वाढवली, पाहा नवीन मुदत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी