दानवे यांनी सत्तारांना दिली 'औरंगाबादच्या औरंगजेबाची' उपमा, म्हणाले .....

central minister ravasaheb danve on abdul sattar and arjun khotkar : दानवे यांनी बोलताना थेट शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. दानवे यांनी निशाणा साधताना आपल्या खास शैलीत म्हटलं आहे की, थेट समोर येऊन बोलण्याची, टीका करण्याची हिंमत नाही, त्यामुळे त्याने म्हणजेच अर्जून खोतकर यांनी औरंगाबादचा औरंगजेब म्हणजेच अब्दुल सत्तार माझ्या मागे लावून दिले आहेत

central minister ravasaheb danve on abdul sattar and arjun khotkar
दानवे यांनी सत्तारांना दिली 'औरंगाबादच्या औरंगजेबाची' उपमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगजेबाची उपमा देत दानवे यांनी निशाणा अब्दुल सत्तारांवर साधला निशाणा
  • औरंगाबादचा औरंगजेब म्हणजेच अब्दुल सत्तार माझ्या मागे लावून दिले – रावसाहेब दानवे
  • निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो,  दानवेंनी केला दावा

जालना :केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार शेख यांच्यावर औरंगजेबाची (Aaurangzeb) उपमा देत निशाणा साधला आहे.  औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच राजकारण तापलेलं असताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज जालना शहरातील पाणी समस्येवर भाजपच्या वतीने मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालना येथे पाणीप्रश्नावर मोर्चा काढण्यात आला असून, यावेळी दानवे यांनी खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोघेही संधी मिळेल त्या व्यासपीठावर एकमेकांवर थेट शब्दात टीका करत असतात. जालन्यातील मोर्चात देखील दानवेंनी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करण्याची संधी  सोडली नाही याची प्रचीती पुन्हा एकदा महाराष्ट्राला आली आहे.

अधिक वाचा : अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये मोठा गोंधळ, ट्रेनवर केली दगडफेक

औरंगाबादचा औरंगजेब म्हणजेच अब्दुल सत्तार माझ्या मागे लावून दिले – रावसाहेब दानवे

दानवे यांनी बोलताना थेट शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. दानवे यांनी निशाणा साधताना आपल्या खास शैलीत म्हटलं आहे की, थेट समोर येऊन बोलण्याची, टीका करण्याची हिंमत नाही, त्यामुळे त्याने म्हणजेच अर्जून खोतकर यांनी औरंगाबादचा औरंगजेब म्हणजेच अब्दुल सत्तार माझ्या मागे लावून दिले आहेत, असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे.

अधिक वाचा : फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल 

निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो,  दानवेंनी केला दावा

जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे विरोधात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यातील शत्रूत्व सर्वपरिचि आहेत .मागील लोकसभा निवडणुकीपासून हे दोघेही रावसाहेब दानवेंवर टीका करत असतात. मात्र, दानवे आज म्हणाले की, निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो, असा दावा दानवेंनी केला आहे.  मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात जालन्यासाठी काय काय काम केले याचे फलक लावू शकतो. मात्र काही जण मंत्री असतानाही त्यांनी पाच वर्षात जालन्यासाठी केलेल्या पाच कामांची यादी शोधावी लागते. असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : VIdeo: टी-२० आहे की कसोटी?  कर्णधार बेन स्टोक्सने लावली आग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी