औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे भव्य सभा होणार आहे. या सभेअगोदर भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथे सभा घेत आहेत. सभेला गर्दी व्हावी यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मला असं वाटत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहरासाठी २२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आम्ही तुमच्या निर्णयाचे स्वागत करतो, कारण आम्हाला गरज आहे रस्त्याची मात्र, औरंगाबाद शहराला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे पिण्याची पाण्याची. अस दानवे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : मुलगी UPSC Exam पास झाल्याच्या दाव्यामुळे कुटुंबियांची माफी
दरम्यान, पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, १६०० कोटी रूपाच्या पिण्याच्या पाण्याची योजना आमच्या सरकारने मंजूर केली होती, ती आपल्या सरकारने रद्द केली. जर रस्त्याला दिले तसेच पैसे तुम्ही आम्हाला पिण्याच्या पाण्याला दिले असते तर औरंगाबादकरांच्या मनामध्ये नक्कीच आनंद झाला असता असंही दानवे यांनी म्हटलं आहे. परंतु हे २२७ कोटी रुपये आपण कधी दिले तर तुम्ही आज येणार आहेत म्हणून असं दानवे म्हणाले.
अधिक वाचा ; टाटांच्या वाहनांवर मिळतेय 40,000 रुपयांपर्यंतची ऑफर,बंपर सूट
जुन्या काळात राजा ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याने गर्दी जमावी म्हणून तिथला प्रधान रस्त्याने पैसे उधळायचा कारण, जर राजा आला आणि प्रजा जर जमली नाही तर, राजा प्रधानावर गरम व्हायचा. कारण, उधळलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू जमा करायला लोक यायची आणि गर्दी जमायची हा अशातलाचं एक प्रकार आहे. असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : राज्यात उरला २६ टक्के पाणीसाठा, कोकणला सर्वाधिक फटका