औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे यांनी केलेले वक्तव्य सतत चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं असून, या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. दानवे यांनी मी राजकारणातील कुंभार असल्याचं म्हटलं आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटंचं निघते. कार्यकर्ता हा भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छच निघायला पाहिजे, असे दानवे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना संबोधित करताना दानवे म्हणाले की, तुम्हला निवडणूकीसाठी तयार करायला आलो आहे. आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचं आहे. नगरपंचायतमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे, असंही दानवे म्हणाले. रविवारी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी घरून डब्बा आणला होता.
अनेकवेळा कोरोन नियमांचे पालन करावं असं नेत्यांकडून सांगण्यात येते. मात्र, दानवे यांच्या आयोजित डब्बा पार्टी कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करण्यात आलं नसल्याचं समोर आले आहे. कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन केलं नव्हते. इतकेच नाही तर कार्यक्रमात कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. हे सर्व पाहिल्यानंतर कोरोना नियम राजकारण्यांना नाहीत का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
“आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है”. सत्तारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभ रहावं. मी तयार आहे, असं आव्हान देखील दानवे यांनी सत्तारांना दिले आहे. सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे ३ उमेदवार १५ मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये १५ हजार मतांची आघाडी होती, ती १५ मतांवर आली आहे. हे म्हणतात मी सिल्लोड मधून त्याच्या विरोधात लढावं. असे थेट आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना दिले आहे.
“आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है”. सत्तारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभ रहावं. मी तयार आहे, असं आव्हान देखील दानवे यांनी सत्तारांना दिले आहे.
सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे ३ उमेदवार १५ मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये १५ हजार मतांची आघाडी होती, ती १५ मतांवर आली आहे. हे म्हणतात मी सिल्लोड मधून त्याच्या विरोधात लढावं. असे थेट आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना दिले आहे.