Eknath Shinde : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी चंद्रकांत खैरे करतायेत 'हे' काम

Chandrakant Khaire is doing a great job to bring back the MLAs : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसैनिकांना परत आणण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. या सर्वांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहे. तसेच माझ सुद्धा काम आहे त्यांची मनधरणी करणे त्यामुळे प्रयत्न करतोय. तसेच आमदारांच्या नातेवाईकांशी सुद्धा बोलणं सुरु असल्याच खैरे म्हणाले. यावेळी पुढे बोलताना खैरे म्हणाले की, कुठेही कोणीही नाराज नाही. सगळे इथेच असून सगळे येतील.

Chandrakant Khaire is doing a great job to bring back the MLAs
आमदारांना परत आणण्यासाठी चंद्रकांत खैरे करतायेत 'हे' काम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे
  • सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत. – चंद्रकांत खैरे
  • कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही: राऊत

औरंगाबाद : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून, शिवसेनेचे अनेक आमदार घेऊन सुरतला एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे हे सुरतला आमदारांसोबत गेल्याने मोठा राजकीय भूकंप येणार होणार असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता गेलेल्या आमदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून सुद्धा या आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क केला जात असून, ते कुठ आहे याची माहिती घेतली जात आहे. 

अधिक वाचा ; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याशी शिंदे असा करतील सुरतेचा तह?

सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत. – चंद्रकांत खैरे

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसैनिकांना परत आणण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. या सर्वांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहे. तसेच माझ सुद्धा काम आहे त्यांची मनधरणी करणे त्यामुळे प्रयत्न करतोय. तसेच आमदारांच्या नातेवाईकांशी सुद्धा बोलणं सुरु असल्याच खैरे म्हणाले. यावेळी पुढे बोलताना खैरे म्हणाले की, कुठेही कोणीही नाराज नाही. सगळे इथेच असून सगळे येतील. सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत. आता एकनाथ शिंदेच्या सोबत किती आहेत सांगता येणार नाही. असंही खैरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : India: T20 वर्ल्डकपआधी या ३ देशांचा दौरा, आशिया कप खेळणार... 

कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही: राऊत

राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असेही राऊत म्हणाले. नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : India: T20 वर्ल्डकपआधी या ३ देशांचा दौरा, आशिया कप खेळणार...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी