Eknath Shinde गट लवकरच संपणार

Chandrakant Khaire made a big secret explosion : चंद्रकांत खैरे यांना पत्रकारांनी शिंदे गटाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शिंदे गट आता लवकरचं संपणार आहे, असं खैरे यांनी बिनधास्त म्हटलं आहे. पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे, आम्ही कुठलीही इतर जागा निवडलेली नाही असंही खैरे म्हणाले.

Chandrakant Khaire made a big secret explosion
शिंदे गट लवकरच संपणार, 'या' नेत्याने दिली प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा खुलासा केला
  • शिंदे गट आता लवकरच संपणार आहे - चंद्रकांत खैरे
  • आम्ही पर्यायी जागा निवडली नाही आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार - खैरे

औरंगाबाद : शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आज माध्यमांसमोर मोठा खुलासा केला आहे. चंद्रकांत खैरे यांना पत्रकारांनी  शिंदे गटाबद्दल (Shinde Group) प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शिंदे गट आता लवकरचं संपणार आहे, असं खैरे यांनी बिनधास्त म्हटलं आहे. दरम्यान, खैरे हे कट्टर शिवसैनिक या नात्याने सतत आपली भूमिका आक्रमकपणे आणि थेट मांडताना पहायला मिळतात. अशीच प्रतिक्रिया त्यांनी आज माध्यमांसमोर दिली आहे. खैरे यांनी बोलताना दसरा मेळावा वादावरही आपले मत वक्त केलं आहे. (Chandrakant Khaire made a big secret explosion)

अधिक वाचा ; तीन दिवसांनी या राशींचे उजळणार नशीब, बनतोय हा शुभ योग

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दसरा मेळावा वादावरही थेट वक्तव्य केलं आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा (Dussehra Melava) होणार की नाही, हा वाद आता हायकोर्टात गेला असून, उद्या त्यावर सुनावणी आहे. उद्धव ठाकरेंसह सर्वांना कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. असा प्रश्न पत्रकारांनी खैरे यांना विचारला असता खैरे यांनी माध्यमांसमोर अगदी बिनधास्त प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने येईल. महापालिका आम्हालाच परवानगी देईल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा : "..यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"असं का म्हणाली गौरी खान?

शिंदे गटावर बोलताना नेमकं काय म्हणाले खैरे?

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही वेगळे परिणाम होतील का? शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? असे प्रश्न खैरे यांना विचारल्यावर खैरे यांनी उत्तर देत म्हटलं की, काही येणार नाही, असं यांनी उत्तर दिले आहे. त्यांनतर महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फडणवीसांनी केला आहे असं खैरेंना विचारण्यात आले. यावर बोलताना खैरेंनी हलकेच उडवून दिलं आहे. ही हाय लेवलची गोष्ट आहे, यावर नंतर बोलू, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

अधिक वाचा : शशी थरूर यांच्या नावावरG-23 नेते असहमत, आणखी एक नेता शर्यतीत 

आम्ही पर्यायी जागा निवडली नाही आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे, आम्ही कुठलीही इतर जागा निवडलेली नाही. काहीही करून परवानगी द्यावीच लागेल असं देखील खैरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी