एमआयएम आणि वंचितला भाजपने लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी दिले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

chandrakant khaire on vanchit bahujan aghadi and mim : एमआयएमसोबत भाजपचे संबध आहे. अनेक निवडणुकीत भाजपला जिंकण्यासाठी मदत करता आणि महाराष्ट्रात सुद्धा केली. त्यामुळे ते भाजपचे 'बी' टीम आहे. असं म्हणत खैरे यांनी एमआयएम आणि मनसेवर सुद्धा निशाणा साधला.

chandrakant khaire on vanchit bahujan aghadi and mim
'लोकसभा निवडणुकीत भाजपने एमआयएम आणि वंचितला एक हजार कोटी दिले'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतले - चंद्रकांत खैरे
  • एमआयएम 'बी; तर मनसे 'सी' टीम - चंद्रकांत खैरे 
  • ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार संतोश बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीवर गंभीर आरोप करत म्हटलं होत की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या निवडणुकीत भाजपकडून १००० कोटी रुपये घेतले आहेत. बांगर यांनी केलेल्या  या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीने संतोष बांगर यांच्या विरोधात आंदोलन देखील केली होती. दरम्यान, पुन्हा अशाच पद्धतीने गंभीर आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे नवीन राजकीय वादाला निर्माण होण्याची शक्यता आहे. 

धिक वाचा ; दिनविशेष: रविवार २९ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले

डीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे – चंद्रकांत खैरे

दरम्यान, चंद्रकांत खैरे हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वंचित आणि एमआयएमवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करता, तुमच्याकडे एवढा पैसा आला? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.  त्याचबरोबर ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचं बोलवायचं आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायचे काम सुरु अस्लायाचे खैरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; एटीएम पिन फक्त 4 अंकी का असतो, यामागचे कारण माहित आहे का? 

एमआयएम 'बी; तर मनसे 'सी' टीम - चंद्रकांत खैरे 

एमआयएमसोबत भाजपचे संबध आहे. अनेक निवडणुकीत भाजपला जिंकण्यासाठी मदत करता आणि महाराष्ट्रात सुद्धा केली. त्यामुळे ते भाजपचे 'बी' टीम आहे. असं म्हणत खैरे यांनी एमआयएम आणि मनसेवर सुद्धा निशाणा साधला. तर औरंगाबाद येऊन मोठी सभा घेणारे 'सी' टीम म्हणून काम करतात. त्यांच्या सभेला भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.

अधिक वाचा ; USच्या नायजेरियातील लॅबमधून जगभर पसरतोय मंकीपॉक्स - रशिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी