वंचितने आक्रमक भूमिका घेताचं चंद्रकांत खैरे मागे हटले, म्हणाले त्यांनी पैसे घेतले नाही तर मी पण माझे शब्द मागे घेतो

Chandrakant Khaire stepped back as Vanchit took an aggressive stance : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे. 

Chandrakant Khaire stepped back as Vanchit took an aggressive stance
वंचितने आक्रमक भूमिका घेताचं चंद्रकांत खैरे मागे हटले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता.
  • 'प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतले' - चंद्रकांत खैरे
  •  एमआयएमवर केलेल्या आरोपावर आपण ठाम – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आंबेडकर यांनी करोडो रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सदर वक्तव्यावर खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता. त्यांनतर आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे. 

अधिक वाचा : जीवनातील समस्यांचा कसा सामना कराल त्याची माहिती देईल हा फोटो

पैसे घेतले नाही तर मी पण माझे शब्द मागे घेतो – चंद्रकांत खैरे

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी असा इशारा बकले यांनी दिला होता. त्याचप्रमाणे प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत, चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. तशाच पद्धतीने माफी देखील मागावी असं बकले यांनी म्ह्टलं आहे. दोन दिवसात खैरे यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असेही बकले म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी पैसे घेतले नाही तर मी पण माझे शब्द मागे घेतो, असे खैरे यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा ; मे महिना ठरला दु:खाचा; अवघ्या चार दिवसात गमावले तीन गायक

काय म्हणाले होते खैरे ?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करता, तुमच्याकडे एवढा पैसा आला? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.  त्याचबरोबर ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचं बोलवायचं आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायचे काम सुरु असल्याचे खैरे यांनी म्हटलं होत.

अधिक वाचा ; BF सोबत लग्न करण्यासाठी बांगलादेशातून पोहत भारतात आली तरूणी 

 एमआयएमवर केलेल्या आरोपावर आपण ठाम – चंद्रकांत खैरे

वंचितबाबत आपला राग नाही. प्रकाश महाविकास आघाडीत येऊ इच्छीता, त्यामुळे त्यांच्यावर माझा राग नाही, असे खैरे म्हणाले. मात्र, एमआयएमवर केलेल्या आरोपावर आपण ठाम असल्याचं खैरे म्हणाले आहे. माझा राग एमआयएम आणि भाजपवर असल्याच खैरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी