पंकजा मुंडेंना महाराष्ट्रातून डच्चू, केंद्राचे गाजर

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jul 03, 2020 | 19:22 IST

Chandrakant Patil announced maharashtra bjp executive committee: भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आले नसल्यामुळे मुंडे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

Chandrakant Patil announced maharashtra bjp executive committee
पंकजा मुंडेंना केंद्राचे गाजर, महाराष्ट्रात मात्र डच्चू!  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • प्रदेश कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान नाही.
  • पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?
  • पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याची चर्चा

बीड: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भारतीय जनता पार्टीची (bjp) महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणी (bjp executive committee) जाहीर केली आहे. यात ५ सरचिटणीस असून १२ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तर १२  सेक्रेटरी, एक कोशाध्यक्ष, ६९ कार्यकारिणी सदस्य, निमंत्रिक सदस्य १३९, विशेष निमंत्रित ५५ असे पदे असणार आहेत. बीड (beed) जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे (MP Preetam Munde) यांना देखील उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. मात्र, भाजपाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलले  असून, पंकजा मुंडे यांना कार्यकारिणीत कुठलेच पद दिले नाही. पंकजा मुंडेना (pankaja munde) डावलण्यात आल्याने पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते पुन्हा नाराज झाले आहेत.

नाराज असलेल्या पंकजा मुंडे पुन्हा नाराज?

काही महिन्यापूर्वी पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्या नाराज असल्याची चर्चा होती. मुंडेनी आपली नाराजी उघडपणे जरी बोलून दाखवली नसली तरी मात्र, सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली होती. विधान परिषदेच्या जागेसाठी यांना उमेदवारी दिली गेली नसल्याने त्यांनी वेगळा डाव आखल्याच्या चर्चा देखील होत्या. विधान परिषद निवडणुकीत भाजपाला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी थोड्या मतांची गरज होती. पंकजा मुंडे यांनी चौथी जागा असुरक्षित करण्याचे नियोजन केले होते? पंकजा मुंडें सोबत भाजपाने केलेल्या विश्वासघाताला चौथी जागा पाडून पंकजा मुंडे यांनी उत्तर देण्याचे ठरवले होत? असं राजकीय जाणकारांच्या मते चर्चा सुरु होती.

'मेरा अंगण, मेरा रणांगण' या आंदोलनातून मुंडे गायब

भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या 'मेरा अंगण, मेरा रणांगण' या आंदोलनामध्ये भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणी मात्र आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या. त्यामुळे तेव्हा देखील पंकज मुंडे या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचा कुठलाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नसल्याने त्या भाजपाच्या आंदोलनात सहभागी झाले नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र नाराज असलेले एकनाथ खडसे अंगणात उतरलेले दिसले होते.

मुंडेना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार- चंद्रकांत पाटील

नारज असलेल्या पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील दिली आहे, मात्र पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात डच्चू देण्यात आला असून, पंकजा मुंडे समर्थक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. दर तीन वर्षानंतर भारतीय जनता पार्टीत स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल केले जातात. मात्र यावेळेस केलेल्या बदलात पंकजा मुंडे यांना राज्यातील राजकारणापासून दूर ठेवले गेले असल्यची चर्चा सुरु आहे. दरम्यान पंकजा मुंडेंना केंद्रात मोठ्या पदाचे गाजर देऊन, चंद्रकांत पाटील यांनी सावधाकीची भूमिका घेतली आहे. मात्र पंकजा मुंडे या केंद्रात जातील का? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी