Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीडमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजा मुंडे यांना म्हणत आहेत की, मी आधी भाषण करत मग तुम्ही भाषण करा. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या क्लिप नंतर आता चंद्रेशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत पंकजा मुंडेंबाबबत मोठं विधान केलं आहे. (Chandrashekhar Bawankule big statement about pankaja munde in jalna read details in marathi)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, फार हास्यास्पद आहे. कृपया असे व्हिडिओ प्रकाशित करुन स्वस्त लोकप्रियता कोणी मिळवू नये. उलट पंकजाताईंनी माझ्यानंतर बोलावे. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे मी आधी मी बोलावं आणि त्यांनी नंतर बोलावं असा आमचा संवाद होता. त्यांनी म्हटलं मी आधी बोलते. सन्मानाने मी त्यांना नंतर बोला असे म्हटलं.
हे पण वाचा : हे आसन कराल तर लठ्ठपणा विसराल
कुणीतरी हे जाणीवपूर्वक करत आहे. कालचा कार्यक्रम खूपच ऊर्जावान झाला. भाजप आणि पंकजा मुंडे यांना बदनाम करत आहे. भारतीय जनता पक्षात पंकजाताई आणि पक्षाला बदनाम करणआरं एक युनिट आहे. ते हे करत आहेत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा : Chanakya Niti: अशा महिला पतीसाठी असतात भाग्यशाली
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे बीडमध्ये एकत्र उपस्थित होते. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व नेते भाषण करत होते. यावेळी भाषणासाठी पंकजा मुंडे यांचे नाव घेण्यात आले तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी आधी भाषण करतो मग तुम्ही भाषण करा असं पंकजा मुंडे यांना सांगितलं.