Change in traffic routes in Chhatrapati Sambhajinagar for Mahavikas Aghadi rally : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' जाहीर सभा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सांस्कृतिक मंडळ मैदान या ठिकाणी आज (रविवार 2 एप्रिल 2023) आहे. या सभेसाठी मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यांतून मोठ्या संख्येन नागरिकांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सभा संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. या सभेकरिता होणाऱ्या गर्दीचा विचार करून छत्रपती संभाजीनगरमधील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सभेत कोण काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी बैठका घेऊन आणि मंडळे तसेच स्थानिक समूह, संघटना यांच्याशी समन्वय राखून सभेला गर्दी जमविण्याचे नियोजन केले आहे.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे