विनायक मेटेंच्या घरी भेट देताच छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी

chhanapati sambhaji raje demanded that jyoti mete should be made an mla: विनायक मेटे यांच्या पश्चात ज्योती मेटेंना आमदार करावं अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे.

chhanapati sambhaji raje demanded that jyoti mete should be made an mla to give justice to all poor marathas in maharashtra
विनायक मेटेंच्या घरी भेट देताच छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदार करावं, संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली मागणी
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेला बळ द्यावे, संभाजीराजेंची मागणी
  • विनायक मेटेंच्या निधनानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र

Jyoti Mete बीड: छत्रपती संभाजीराजे (Chhanapati Sambhaji Raje) यांनी आज स्वर्गीय विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या बीड  (BEED) येथील निवासस्थानी भेट घेऊन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष व संघटनेला टिकवण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. (Chhanapati Sambhaji Raje demanded that Jyoti Mete should be made an MLA to give justice to all the poor Marathas in Maharashtra.) 

'मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे. तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोठेही आमदारकी द्यावी.' अशी मागणी माजी खासदार संभाजीरजे यांनी केली आहे.

अधिक वाचा: सुसाट वेगाने केला घात, मेटेंच्या कार अपघाताचे एक कारण समजले

दुसरीकडे अशाच प्रकारची मागणी शिवसंग्राम पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि विनायक मेटे यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे स्थानिक जनमताचा कौल लक्षात घेऊन ज्योती मेटे यांना आमदारकी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल पत्नी ज्योती मेटे यांनी व्यक्त केला संशय

दुसरीकडे विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी ज्योती मेटे यांनी काहीसा संशय व्यक्त केला आहे. 'विनायक मेटे यांचा अपघात आहे की घातपात याबद्दल मलाही संशय वाटतो. त्यामुळे या घटनेची चौकशी व्हावी आणि जे काही सत्य असेल ते समोर यावे.' अशी मागणीही ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. 

अधिक वाचा: Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघातानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्या होत्या त्यावरुन त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत काहीसा संशय व्यक्त केला होता. 

तशाच स्वरुपाचा संशय विनायक मेटेंच्या पत्नीने देखीव व्यक्त केला. 'तीन तारखेलाही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्या दिवशीही मेटे साहेबांची गाडी दुसर्‍या गाडीला टक्कर द्यावी अशा पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे आता घडलेल्या अपघाताचा आणि मागील घटनेचा काही संबंध आहे का हे तपासलं पाहिजे.' असे ज्योती मेटे म्हणाल्या होत्या.  

अधिक वाचा: Mumbai-Pune Accident : गोव्याहून फिरून आले काही वेळात घरी पोहचणार, इतक्यात होत्याचे नव्हते झाले

मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचे आदेश 

दरम्यान, विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणाची दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी