Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, दिला इशारा

chhatrapati sambhajiraje targeted central and maharashtra goverment : छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होत. राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांना न्याय दिला - छत्रपती संभाजी महाराज

chatrapati sambhajiraje targeted central and maharashtra goverment
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १९६३ पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडेट क्लास म्हणून केंद्रात आरक्षण मिळत होतं
  • सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करावे लागेल – सर्वोच्च न्यायालय
  • घटनादुरुस्तीवेळी मला पार्लमेंटमध्ये बोलू दिले गेले नाही – छत्रपती संभाजीराजे

Chhatrapati Sambhaji On Maratha Reservation । सोलापूर : जर आरक्षणाच्या(Reservation) मागण्या पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई (Pune to Mumbai) लॉंग मार्च काढावा लागेल असा इशारा राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj)यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी मराठा आरक्षण ( Maratha Reservation) आणि इतर मागण्यांवरुन राज्य (State) आणि केंद्र सरकारला (Central Govt.)इशारा हा इशारा दिला आहे. यापुढे आता पहिला टप्पा म्हणून ३५  किलोमीटर चालायच आहे. रोज किलोमीटर वाढवूयात. एक पोलीस अधिकारी म्हणाला २ किलोमीटर अंतर आहे. पण मी म्हटलं असू द्या. आता मागे फिरणार नाही. आता आपण लोकांमध्ये जाऊयात ,  छत्रपती लोकांमध्ये राहतात हे दखवुन देऊ, असं देखील छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटलं आहे.

१९६३ पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडेट क्लास म्हणून केंद्रात आरक्षण मिळत होतं

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होत. राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांना न्याय दिला, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. १९६३ पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडेट क्लास म्हणून केंद्रात आरक्षण मिळत होतं. मात्र, मध्यंतरी काही आयोग निर्माण झाले आणि आरक्षण रद्द झाले असं देखील संभाजी महाराज यांनी म्हटलं आहे.

सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करावे लागेल – सर्वोच्च न्यायालय

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांगितले आहे की, तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितलं. मात्र, सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पुढे बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा मागासलेला नसून पुढारलेला असल्याचे सांगितलं आहे. निकालानंतर मी शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रपती सर्वांची भेट घेतली होती असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

 

घटनादुरुस्तीवेळी मला पार्लमेंटमध्ये बोलू दिले गेले नाही – छत्रपती संभाजीराजे

घटनादुरुस्तीवेळी मी पार्लमेंटमध्ये बोलत असताना बोलू दिले गेले नाही, मी भांडलो, त्यानंतर माध्यमांसमोर बोललो. पार्लमेंटमध्ये ही टर्म बदलावी आणि मराठा समजासह इतर पटेल, गुर्जर इत्यादी समाजाच्या आरक्षणाच्या मार्ग मोकळा होईल, असं खासदार संभाजी छत्रपती म्हटलं आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की ते अधिकर राज्य शासनाला दिले आहेत. इंद्रा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले असल्याचं संभाजी छत्रपती म्हणाले. असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर मराठा आरक्षण देता येऊ शकेल, असा इंद्रा सहानी केसमधील निकाल आहे. असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी