CM Uddhav Thackeray : औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेची चर्चा जोरात सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला देखील परवानगी मिळण्यास अनेक अडथळे येत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी दिली आहे. खडकेश्वर भागातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होत आहे. येत्या ०८ जून रोजी औरंगाबादच्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिना निमित्ताने उद्धव ठाकरे यांची ही जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे येत्या ८ जून रोजीच्या या जंगी सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा ; वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने ही चाचणी करणे आवश्यक
शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे पोलिसांनी हे परवानगी पत्र दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या या पत्रात १६ अट घालून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पोलिसांकडून १६ अट घालून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी काहीं अटींचे उल्लंघन झाल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हादेखील दाखल झाला आहे. त्यामुळे, शिवसेनेला पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे, हे मात्र नक्की.
अधिक वाचा ; रोहित आणि विराटसाठी आगामी टी-२० वर्ल्डकप शेवटचा असू शकतो
अधिक वाचा ; जळगावात महिलेच्या पोटातून काढला साडे चार किलोचा ट्युमर