औरंगाबाद : ख्रिश्चन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखविल्या जात असल्याचा आरोप करत आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिस्ती प्रार्थना हक्क आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात आंदोलनकारी ख्रिश्चन समाजाच्या लोकानी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना सभेवर वेगवेगळे चुकीचे आक्षेप घेवून ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचा डाव काहीजण आखत असल्याचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर यामुळे ख्रिश्चन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखविल्या जात असल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला आहे.
अधिक वाचा : 'या' मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाकडे सापडली AK-47 रायफल
ख्रिश्चन धर्मगुरूची प्रतिमा मलिन करण्यात आली – आंदोलक
दरम्यान, आंदोलनावेळी आंदोलक म्हणाले की, औरंगाबाद येथील पारूंडी गावातील प्रार्थना सभेवर आक्षेप घेवून विनाकारण संबंधित ख्रिश्चन धर्मगुरूची प्रतिमा मलिन करण्याचा डाव करण्यात आला आहे. पारूंडी गावातील प्रार्थना सभेमुळे कोणताही अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याचा भंग झालेला नसल्याचे देखील आंदोलक म्हणाले. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरूची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम ख्रिश्चन बांधवाच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या आहेत, यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये व प्रार्थना सभा सुरळीत होवू द्यावीत अशी देखील मागणी आंदोलकांनी केली आहे.
अधिक वाचा : विहिरीत पडलेल्या लेकाला वाचवायला बापाची धाव,पण घडला अनर्थ
१ ) ख्रिश्चन धर्मगुरू धर्मांतर करतात हा खोटा आरोप असून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यास आमचा विरोध आहे. कारण तसे असते तर ख्रिश्चन समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या खूप वाढली असती. असं आंदोलकानी म्हटलं आहे.
२ ) पालघर येथे ही ख्रिश्चन धर्मगुरू यांना अर्वाच्य भाषा वापरून त्यांना घेरून त्यांच्या वर दबाव टाकण्यात आला आहे. खरे पाहता त्या परिवाराने त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी त्या धर्मगुरू व सिस्टरांना बोलविले होते. त्यामुळे संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ख्रिश्चन बांधवाच्या वतीने करण्यात आली आहे.
३) बुलढाणा येथिल ख्रिस्ती प्रार्थना सभा काही जणांनी उधळून लावली व त्या ठिकाणा वरिल पविञ वधस्तंभ व पाण्याची बाप्तीस्मा टाकी याचा अवमान केला आहे. तरी संबंधिता वर कारवाई करावी अशीही मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली आहे.
अधिक वाचा : तेजस्वी यादवांच्या मॉलवर CBI चा छापा, राबडी देवी म्हणाल्या..