Corona Cases : कोरोनाने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार ५० हजार सानुग्रह मदत

Corona's death heirs will get assistance of Rs 50,000 : कोरोना या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल

Corona's death  heirs will get assistance of Rs 50,000
कोरोनाने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार ५० हजार मदत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना काळात कोरोना झाल्याने अनेकांचा बळी देखील गेला असल्याच्या घटना
  • कोरोना या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान
  • घरातील कर्तेमंडळी वारल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले तर अनेक मुले अनाथ झाली

उस्मानाबाद : राज्यात काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान, कोरोना काळात कोरोना झाल्याने अनेकांचा बळी देखील गेला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. (Corona's death  heirs will get assistance of Rs 50,000)

 कोरोना या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल आणि याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोरोना संकटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यात घरातील कर्तेमंडळी वारल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले तर अनेक मुले अनाथ झाली त्यांना या मदतीचा आधार मिळणार आहे.

उस्मानाबादमध्ये कोरोना मृतदेहदर होता सर्वाधिक

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा मृतदेह हा राज्यात सर्वाधिक होता. दुसरी लाटेचा मोठा फटका उस्मानाबाद जिल्ह्याला बसला होता. दरम्यान, एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ देखील आली होती. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत मिळणार असल्याने अनेक कुटुंबातील लोकांना मोठा आधार मिळणार असल्याचे दिसत आहे.

उस्मानाबादच्या स्मशानभूमीत एकाचवेळी करण्यात आले होते १९ जणांवर अंत्यसंस्कार

उस्मानाबादच्या स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळाले होते. १४ एप्रिल रोजी एकाचवेळी  १९ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे चित्र पाहून स्मशानभूमी देखील गहिवरली असेल! असचं हे चित्र होत. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत आज १९ मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक - एक फुटावर सरण रचण्यात आली होती. त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.  

अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे ८ मृतदेहांवर दुसऱ्या दिवशी करण्यात आले होते अंत्यसंस्कार

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे ८ मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात आले होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत जाऊ लागले होते. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत कमी पडू लागली होती. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात होते. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले होत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी