५ वर्षापूर्वी चिमुकल्याला आईने विष पाजून केले होते ठार, न्यायालयाने दिली भयानक शिक्षा

court sentenced lifetime imprisonment to mother : ०२ ऑगस्ट २०१६ रोजी तिने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती. सदर चिमुकल्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या चुलत याला आला होता. याबाबत हत्या झालेल्या चिमुकल्याचे चुलते श्रीकांत माळवदकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

court sentenced lifetime imprisonment to mother
५ वर्षापूर्वी चिमुकल्याला आईने विष पाजून केले होते ठार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २०१६ या साली आईने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती
  •  स्वाती यांना एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले होते
  •  स्वाती यांना एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले होते

court sentenced lifetime imprisonment to mother पुणे : तीन वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून त्याची निर्घृणपणे  हत्या (Brutal murder) केली होती. दरम्यान,  आईनेचं आपल्या चिमुकल्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यावर नायायालयाने आईला कठोर शिक्षा दिली आहे. सदर घटनेची न्यायालयात एक - दोन नव्हे तर तब्बल ५ वर्षे सुनावणी झाली असून, दोषी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर महिला पुण्यातील (Pune) तळवडे येथील रहिवासी आहे. दरम्यान , न्यायालयाने आईला सात हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश जी पी अगरवाल यांनी हा महत्त्वपर्ण  सुनावला आहे.

२०१६ या साली आईने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती

०२ ऑगस्ट २०१६ रोजी तिने आपल्या पोटच्या लेकराला विष पाजून त्याची हत्या केली होती. सदर चिमुकल्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या चुलत याला आला होता. याबाबत हत्या झालेल्या चिमुकल्याचे चुलते श्रीकांत माळवदकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हत्या झालेल्या चिमुकल्याच्या आईचे नाव स्वाती विक्रम माळवदकर असं आहे. स्वाती माळवदकर हीच वाट २५ वर्षी इतकं असून ती पुण्यातील तळवडे येथील रहिवासी आहे. घटनेच्या पाच वर्षांनंतर सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने आई स्वाती यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निगडी पोलिसांनी घटनेचा तपास हा अत्यंत शिताफीने केला होता. त्यामुळे दोषी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 स्वाती यांना एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले होते

संपूर्ण माळवदकर कुटुंब हे एकत्रित राहत होते. त्यांच्या कुटुंबात  फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विक्रम माळवदकर आपल्या आई-वडिल असा एकत्रित परिवार होता. परंतु स्वातीला सर्व कुटुंबासोबत एकत्रित राहायचे नव्हते तिला आपल्या पतीसोबत वेगळे राहायचे होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. या वादातून स्वाती यांचे सासू-सासरे गावी जाऊन राहू लागले. पण सर्वांनी एकत्र राहावं, अशी स्वातीच्या पतीची म्हणजेच विक्रम माळवदकर याची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्याच बऱ्याचदा वाद झाला होता. 

अशी घडली होती घटना?

घटनेच्या दिवशी वाद दोघा पत्नी पत्निमध्ये वाद झाला होता. वाद झाल्यामुळे पती घरातून बाहेर निघून गेले होते. काही वेळानंतर पतीने स्वातीला फोन लावला, मात्र, स्वाती पतीचा फोन उचलत नव्हती. त्यामुळे स्वातीचे पती विक्रम यांनी आपल्या भावाला म्हणजेच फिर्यादी असणाऱ्या श्रीकांत यांना फोन लावून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. भावाच्या सांगण्यावरून  श्रीकांत घरी गेला असता, तीन वर्षीय पुतण्या अंथरुणात निपचित पडलेला दिसला. तर वहिनी स्वाती या घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. ही घटना उघडकीस येताच श्रीकांत यांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केले. पण याठिकाणी जाताच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर स्वाती यांच्यावर काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, सदर घटनेनंतर स्वातीचे दीर श्रीकांत यांनी स्वाती विरोधात फिर्याद दिली आणि गुन्हा नोंद करून घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी