nine teachers covid19 positive : एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना कोरोना, शाळा बंद

Covid19 positive nine teachers in one school in Aurangabad, school closed : औरंगाबादच्या लाडसावंगी जिल्हा परिषद प्रशालेत सहा शिक्षक आणि तीन शिक्षिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना एकदम कोरोनाची बाधा झाल्यामुळे शाळा लगेच आठवड्याभरासाठी बंद करण्यात आली आहे. 

Covid19 positive nine teachers in one school in Aurangabad, school closed
nine teachers covid19 positive : एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना कोरोना, शाळा बंद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना कोरोना, शाळा बंद
  • सहा शिक्षक आणि तीन शिक्षिकांना कोरोनाची बाधा
  • कोरोनाबाधीत झालेल्या शिक्षकांना क्वारंटाइन केले

Covid19 positive nine teachers in one school in Aurangabad, school closed : औरंगाबाद : औरंगाबादच्या लाडसावंगी जिल्हा परिषद प्रशालेत सहा शिक्षक आणि तीन शिक्षिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना एकदम कोरोनाची बाधा झाल्यामुळे शाळा लगेच आठवड्याभरासाठी बंद करण्यात आली आहे. 

लाडसावंगी जिल्हा परिषद प्रशालेत पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत शिक्षक-शिक्षिका असा २१ जणांचा ताफा कार्यरत आहे. या २१ शिक्षकांपैकी नऊ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शाळा सुरू होती. शाळेतील तीन शिक्षकांची १७ जानेवारी २०२२ रोजी कोरोना चाचणी झाली. आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्यामुळे या शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले. यानंतर शाळेच्या उर्वरित १८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत आणखी सहा शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. 

कोरोनाबाधीत झालेल्या शिक्षकांना क्वारंटाइन केले आहे. शिक्षकांचे उपचार वैद्यकीय देखरेखीत सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने शाळा आठवड्याभरासाठी बंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधीत झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची नियमानुसार ठराविक दिवसांच्या अंतराने पुढील काही दिवस सातत्याने तपासणी होईल. या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचे उपचार लगेच सुरू होतील. 

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ शिक्षक कोरोनाबाधीत आढळले असले तरी महाराष्ट्रात सोमवार २४ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. ज्या भागांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे त्या भागांमध्येच शाळा सुरू होतील. शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल; अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी