बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसाला अटक

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Mar 03, 2021 | 16:55 IST

crime regesterd against cop : महिलेने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्काराचा उलगडा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर पोलीस कर्मचारी उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत आहे

crime regesterd against cop
बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसाला अटक  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बंदुकीचा धाक दाखवत होता पोलीस कर्मचारी
  • सदर पोलीस कर्मचारी उस्मानाबाद पोलीस दलातील आहे
  • परांडा तालुक्यातही पोलिसाने केला होता महिलेवर बलत्कार

उस्मानाबाद – उस्मानाबाद पोलिसांची (osmanabad police) खाकी वर्दी पुन्हा एकदा डागाळली आहे. गेल्या १५ दिवसापुर्वीच पारधी समाजाच्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर पोलिसाने बलात्कार (rape) केली असल्यची घटना ताजी असतानाच उस्मानाबाद शहरातील (osmanabad city) हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेला बंदुकीचा (rivolver) धाक दाखवत बलात्कार केल्याने त्या महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. बलात्काराच्या सलग दोन प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांचे कृत्य समोर आल्याने खाकीला पुन्हा एकदा डाग लागला आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणे व बलात्कार केल्या प्रकरणी हरिभाऊ कोळेकर (haribhau kolekar) या पोलिसाला (police) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बंदुकीचा धाक दाखवत होता नराधम पोलीस

दरम्यान, सदर महिलेने काल सायंकाळी आपल्या राहत्या घराशेजारी एका इमारतीत खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी दोन सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. महिलेने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्काराचा उलगडा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले असून, सदर पोलीस कर्मचारी उस्मानाबाद पोलीस दलात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काय आहे महिलेच्या सुसाईड नोटमध्ये

मी ............ मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे, त्या कोळेकरच्या घरी कारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला सारखे धमकावत होता, बंदुकीचा धाक दाखवून, यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही.

दुसरी आत्महत्या चिट्टी -

मी ..................... वय 32 मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार फक्त हरिभाऊ रामदास कोळेकर आहे. त्याने माझ्यावर घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला धमकावू लागला, बंदुकीचा धाक दाखवत होता.

या कलमानुसार पोलिसावर गुन्हा दाखल

दरम्यान, महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोट वरून हरिभाऊ कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७६ (बलात्कार) ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलीस अधीक्षक मोतीचंद राठोड यांनी तपास करीत तात्काळ अटक केली आहे.

परांडा तालुक्यातही पोलिसाने केला होता महिलेवर बलत्कार

काही दिवसांपूर्वी चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) घडला होता. पारधी समाजातील एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी