cyber crime : ३०० रुपयाची थाळी पडली लाखाला , 'अशी' झाली फसवणूक, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Aurangabad cyber crime : औरंगाबादेतील भोज थाळीच्या मालकाला काही दिवसापूर्वी दोन लोक रोज येऊन भेटायचे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी या प्रकाराबाबत सायबर क्राईमकडे तक्रारही केली. त्यानंतर काही काळात हा भामटा शांत राहिला मात्र, पुन्हा काही दिवसानंतर हा सक्रिय झाला असल्याची माहिती समोर आली आहे

cyber crime : In Aurangabad, a person was cheated of Rs 1 lakh
३०० रुपयाची थाळी पडली लाखाला , 'अशी' झाली फसवणूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३०० रुपयांमध्ये असणारी थाळी चक्क ९९ हजार ८९० रुपयांमध्ये पडली
  • सदर जाहिरात आजही फेसबुक वर आहे
  • सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Crme news in Aurangabad । औरंगाबाद : रोज नव्या नव्या युक्त्या करून सायबर भामटे सर्वसामान्य (cyber crime) लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालताना दिसतात. या भामट्यावर रोज वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत असल्याचं देखील पहायला मिळत आहे. गुन्हे दाखल होत असून, देखील भामटे पोलिसांच्या (police) तावडीत सापडत नाहीत. विशेष म्हणजे जनजागृती केली जात असतानाही लोकं या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad ) असाच प्रकार समोर आला आहे. एका भोजन थाळी वर दोन थाळी फ्री अशी जाहिरात भामट्यांनी फेसबुकला (faceboock) दिली आणि या जाहिरातीतील अमिषाला बळी पडून एक सर्वसामान्य व्यक्ती एक लाख रुपयाला गंडला आहे. पूर्वी वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्याच्या नावाने त्यांचा ओटीपी (otp) मिळवून हे फसवणूक करत असत. मात्र आता ते थेट हॉटेलच्या थाळीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे हे भामटे कधी कुठली स्कीम देऊन फसवतील याची काही शास्वती नाही.

३०० रुपयांमध्ये असणारी थाळी चक्क ९९ हजार ८९० रुपयांमध्ये पडली

दरम्यान, घडलेला सर्व प्रकार असा आहे की, भामट्यांनी फेसबुक वरती एक जाहीरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये शाही भोज थाळीच्या बाय वन गेट टू फ्री अशी ऑफर देण्यात आली. या ऑफरला बाळासाहेब ठोंबरे शेतकरी बळी पडले आहेत. थाळी बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. दरम्यान, त्यांनी बुकिंगसाठी त्यात दिलेल्या क्रमांकावर फोन करणे चांगलेच महागात पडले आहे. बाळासाहेब ठोंबरे यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांवर फोन लावला असता समोरून बुकिंग केवळ ऑनलाइन होते, असे सांगण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवून ठोंबरे यांनी स्वतःसह क्रेडिट कार्डची सर्व माहिती दिली. तसेच मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांकही सांगितला आणि बाळासाहेब ठोंबरे याच्या बँक खात्यातील रक्कम भामट्यांनी काढून घेतली. त्यामुळे ३०० रुपयांमध्ये असणारी थाळी बाळासाहेब ठोंबरे यांना चक्क ९९  हजार ८९० रुपयांमध्ये पडली आहे.

सदर जाहिरात आजही फेसबूकवर आहे

औरंगाबादेतील भोज थाळीच्या मालकाला काही दिवसापूर्वी दोन लोक रोज येऊन भेटायचे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी या प्रकाराबाबत सायबर क्राईमकडे तक्रारही केली. त्यानंतर काही काळात हा भामटा शांत राहिला मात्र, पुन्हा काही दिवसानंतर हा सक्रिय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, धक्कादायक म्हणजे लोकांना लाखो रुपयाचा गंडा घालणारी  जाहिरात आजही फेसबूकवर आहे.  फोन केल्यावर देखील भामटा फोन उचलतो अशी माहिती मिळाली आहे. 

सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अशी कुठलीही जाहिरात आल्यावर त्याला बळी पडू नका असं आवाहन अनेकवेळा पोलीस करतात मात्र, लोक भामट्यांच्या भूलथापांना बळी पडतात.आणि आपली फसवणूक स्वतः करून घेतात. सदर प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी