औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार कोसळण्याअगोदर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असा प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजूर करण्यात आला होता. मात्र, यानंतर राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेले सर्व प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा हा प्रस्ताव मंजूर केला. सदर प्रस्तावाला एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. इम्तियाज जलील हे सतत करत असलेल्या विरोधावरून भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी जलील यांना टोला लगावला आहे.
अधिक वाचा : सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य
इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याला विरोध केला आहे. यासाठी त्यांनी औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा देखील काढला आहे. जलील यांनी काढलेल्या मोर्च्यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी जलील यांना लगावला आहे.
अधिक वाचा : मुंबईकरांनो,उद्या घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवे म्हणाले की, “संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुस्लीम समाजातील एकाही मुलाचं नाव औरंगजेब नाही, असं मला स्वत:ला माहीत आहे. आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवायला सुरुवात करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा” असा खोचक टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला आहे. संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात. औरंगजेब नाव एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे.
अधिक वाचा ; पर्सनल लोनचे हप्ते जड होतायेत? दुसऱ्या बँकेत करा हस्तांतरण
दरम्यान, पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? त्याचबरोबर तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? असा सवाल देखील रावसाहेब दानवे यांनी एमआयएमला केला आहे.