नायलॉनच्या दोरीने सुनेने सासूचा गळा आवळला, डॉक्टरांच्या शंकेने सूनेचं पितळं उघड

Daughter-in-law killed mother-in-law in pune : पुण्यात हत्येच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. आता एका हत्येच्या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुनेने क्षुल्लक कारणामुळे सासूचाच खून केल्याची घटना घडली आहे

Daughter-in-law killed mother-in-law in pune
नायलॉनच्या दोरीने सुनेने सासूचा गळा आवळला, डॉक्टरला आली शंका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुनेने शुल्लक कारणामुळे सासूचाच खून केला
  • सुनेनं नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला
  • पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली

पुणे : पुण्यात हत्येच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. आता एका हत्येच्या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुनेने क्षुल्लक कारणामुळे सासूचाच खून केल्याची घटना घडली आहे. सदर हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून खळबळ उडाली आहे. सासूने आपल्या मुलीला जेवायला दिलं नाही म्हणून थेट सुनेने सासूचा खून केल्याचं उघडकीस आल आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सदर घटनेत अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

अधिक वाचा : महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार का? पवार म्हणाले...

नेमकी काय घडली घटना?

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुल्लक कारणामुळे सासू आणि सुनेमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे सुनेने सासूचा खून केला आहे. सून काही कामामुळे बाहेर गेली होती. यावेळी सासूने घरी असून देखील स्वयंपाकच केला नाही. त्यामुळे आपली मुलीला जेवण मिळालं नाही आणि ती उपाशी राहिली. यामुळे सुनेच्या रागाचा पारा चढला आणि यावरून सासू आणि सुनेमध्ये वाद झाला आणि यातूनच सुनेने सासूचा खून केला असल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा अशोक मुळे राहणार चाकण असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे तर सुवर्णा सागर मुळे (वय ३२) असं आरोपी सुनेचे नाव आहे.

अधिक वाचा : प्लॅस्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीमधील फरक तुम्हाला माहित आहे का

सुनेनं नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला

सदर घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं आहे. सुनेनं नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला असल्याच देखील पोलीस तपासात समोर आल आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार सासू आणि सुनेमध्ये सतत वाद सुरू असायचे. अशात मुलीला जेवण न देण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या होत्या.

अधिक वाचा : लॅपटॉप खरेदीवर मिळवा एक वर्षासाठी डेटा फ्री, जिओची खास ऑफर 

पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली

सुनेने सासूचा गळा आवळल्यानंतर सासू बेशुद्ध अवस्थेत पडली.त्यानंतर देखील सुनेने सासूकडे लक्ष दिले नाही. काही वेळाने मुलगा घरी आल्यानंतर सासूला फीट येऊन पडल्या असं तिने सांगितलं. मुलाने तातडीने रुग्णलयात नेलं असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर डॉक्टरांना आलेल्या शंकेमुळे त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी