dead in the maratha reservation movement मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार शासकीय नौकरी , आरक्षणासाठी अनेक कुटुंबातील तरुणांनी दिलंय बलिदान

dead in the maratha reservation movement will get government jobs : बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज १० लक्ष रुपये मदत वितरित केली आहे, अशा आशयाचं राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला

dead in the maratha reservation movement will get government jobs
आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार शासकीय नौकरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात येणार
  • राज्य शासनाने आज १० लक्ष रुपये मदत वितरित केली आहे
  • आरक्षण मिळविण्याच्या लढ्यात अनेक मराठा बांधव तरुणांनी बलिदान दिलं आहे.

dead in the maratha reservation movement  जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजातील अनेक बांधवांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असून, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबातील वारसांना शुक्रवारी १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या दिलेल्या बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान,  मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा बांधव लढा देत आहेत. मागील काही काळापासून हा लढा तीव्र होत आहे. आरक्षण मिळविण्याच्या लढ्यात अनेक मराठा बांधव तरुणांनी बलिदान दिलंय. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळावी, अशा मागणींनी जोर धरला होता. आता या मागणीला यश मिळावे असेच म्हणावे लागेल.  

वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात येणार

"मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या ३४ जणांना १० लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला. असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे, याचबरोबर वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजातील ३४ युवकांच्या कुटुंबातील वारसांना १० लाखांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी शुक्रवारी (१० डिसेंबर) ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यातच राजेश टोपे यांनी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

राज्य शासनाने आज १० लक्ष रुपये मदत वितरित केली आहे

बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज १० लक्ष रुपये मदत वितरित केली आहे, अशा आशयाचं राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले. 

या कुटुंबाचा आहे सामावेश

बीडमधील ११ कुटूंब, उस्मानाबादमधील २ कुटूंब,  औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कुटूंब, जालनामधील ३ कुटूंब, नांदेडमधील २ कुटूंब, लातूरमधील ४ कुटूंब, पुण्यातील ३ कुटूंब, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश असून, एकूण ३४ कुटुंबियांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी