बापरे ! बालकांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळून आल्याने मोठी खळबळ

dead rat found in school nutrition in anganwadi : अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूमध्ये समोर आला

dead rat found in school nutrition in anganwadi
बालकांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळून आल्याने मोठी खळबळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गव्हाच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळून आल्याने बसला धक्का
  • घटनेनंतर परीसरातील पालकांनी अंगणवाडीत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला
  • पालकांच्या तक्रारीनंतर अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा करत अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला

औरंगाबाद : अनेकदा बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या किंवा किडे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूमध्ये समोर आला आहे. सदर प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले आहे. त्याचबरोर या प्रकारानंतर पालकवर्गात संतप्त भावना व्यक्त होत असून, या घटनेचा अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा केला आहे.

गव्हाच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळून आल्याने बसला धक्का

प्रत्येक वेळेला दिला जाणारा बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिला जाणारा पोषण आहार यावेळी देखील सर्वाना दिला गेला. मंगळवारी वाळूजच्या अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाभार्थींना पोषण आहाराची पाकिटे वाटप करण्यात आली होती. विद्या जोशी या अंगणवाडी कार्यकर्त्या असून, त्यांनी सदर पाकिटे  आराध्या अहिरे हिच्या पालकाकडे ही पाकिटे दिली. दरम्यान, आराध्याचे पालक शेजारीच राहणाऱ्या भाचा गौरव माळी व रूपाली माळी या दोघांचीसुद्धा पोषण आहाराची पाकिटे सोबत घेऊन गेल आणि त्यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालकांनी पाकीट उघडूनपहिली असता मोठा धक्का बसला कारण पाकीट उघडताच या पाकिटात पोषण आहाराएवजी चक्क मेलेला उंदीर आढळून आला.

घटनेनंतर परीसरातील पालकांनी अंगणवाडीत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला

दरम्यान, पालकांनी गव्हाच्या पाकिटात मेलेला उंदीर आढळून येताच, इतर पालकांना देखील सदर घटनेची माहिती मिळताच इतर पालकांना देखील बोलावून घेण्यात आले आणि परीसरातील सर्व पालकांनी अंगणवाडीत धाव घेतली आणि पाकिटात आढळलेला उंदीर दाखवून हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी पालकांमध्ये मोठा राग देखील पाहायला मिळात होता. तर पालकांच्या तक्रारीनंतर अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा करत अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला आहे. 

काही वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती

शालेय पोषण आहारातील मध्यान्ह भोजनात पुन्हा एकदा निष्काळजीपणा समोर आला होता. उत्तर प्रदेश राज्याच्या मुजफ्फरनगर येथील एका शाळेत वाढण्यात आलेल्या जेवणात मेलेला उंदीर सापडला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिकारी अमित कुमार सिंह यांनी सांगितले होते की एका प्लेटमध्ये एक मेलेला उंदीर पाहिल्यानंतर मुस्तफाबाद पंचेंदा गावातील जनता इंटर कॉलेजचे आठ विद्यार्थी आणि एक शिक्षक आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता.  हापुडमधील एनजीओ जनकल्याण समितीने शाळेतील मध्यान्ह भोजन तयार करत होते. सिंह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या निष्काळजी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे देखील आदेश दिले देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी