Child marriage: बालविवाहाने घेतला जीव, उस्मानाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना, कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल

Death of a minor pregnant woman : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या २८ वर्षीय तरुणाशी अवघ्या १५ व्या वर्षी करण्यात आला होता.

Death of a minor pregnant woman in Osmanabad
बालविवाहाने घेतला जीव ,उस्मानाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते
  • बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
  • १५ ऑक्‍टोबर रोजी या अल्पवयीन मातेचं निधन झालं

उस्मानाबाद : लग्नासाठी वयाची अट घालून दिली असताना देखील लग्नाच्या वयाची योग्य वाट न बघता अनेकजण आपल्या मुलीचे लग्न वयात येण्याअगोदर करून देतात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, सामाजिक दबावाखाली मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रकार आज देखील घडत असल्याच पहायला मिळत आहे. मात्र, आई – वडिलांनी केलेल्या या चुकीची किंमत मुलींना चुकवावी लागते. कधी कधी तर याची किमत जीव गमावून चुकवावी लागते. अशीच एक दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात ( osmanabad District ) घडली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा गाडा हाकण्याची पुसटशी कल्पना नसलेल्या एका मुलीचा सोळाव्या वर्षी मातृत्व आलं अन् तिचा मृत्यू झाला. (Death of a minor pregnant woman in Osmanabad )

अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापूर येथील अजित बोंदर या २८ वर्षीय तरुणाशी अवघ्या १५ व्या वर्षी करण्यात आला होता. आणि वर्षभरातच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अन वयाच्या १६ व्या वर्षी तिला आई – वडिलांनी चुकीच्या वयात  केलेल्या लग्नामुळे जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर सहा लोकांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोना काळात ११ जून २०२० रोजी अजित बोंदर आणि सदर मयत मुलीचा विवाह सोहळा उत्तमी कायापूर येथे पार पडला होता.

बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

दरम्यान, सदर मुलीला ७ ऑक्टोंबर रोजी बाळंतपणासाठी तिला उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, १३ ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले. यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. १४ ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती.

 

१५ ऑक्‍टोबर रोजी या अल्पवयीन मातेचं निधन झालं

वय खूप लहान असल्याने झालेल्या वेदना ती सहन करू शकली नाही. त्याचबरोबर , तिचा कोरोनाचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, १५ ऑक्‍टोबर रोजी या अल्पवयीन मातेचं निधन झालं. कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला असल्यामुळे  या प्रकरणी मुलीचे वडील भारत घुगे, (आई) चंद्रकलाबाई घुगे (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे, राम घुगे तर (पती) अजित बोंदर, (सासू) जनाबाई बोंदर, (सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा नुसार ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी