अजित पवारांचा मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांचा दौरा

औरंगाबाद
Updated Jun 17, 2021 | 20:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार १८ जून २०२१ रोजी मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ते कोरोना संकटाची स्थिती आणि खरीप हंगामाची तयारी याचा आढावा घेणार आहेत. 

Deputy Chief Minister of Maharashtra Ajit Pawar Marathwada Tour
अजित पवार यांचा उद्या मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यामध्ये दौरा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे काही दिवसांपूर्वीच झाले होते दौरे
  • खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड परस्थितीचा आढावा घेण्याच्या कारणाने अजित पवार यांचा दौरा
  • उद्या सकाळपासून होणार मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात

बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार १८ जून २०२१ रोजी मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ते कोरोना संकटाची स्थिती आणि खरीप हंगामाची तयारी याचा आढावा घेणार आहेत. अजित पवार यांचा हा दौरा प्रशासकीय असला तरी या दौऱ्याला राजकीय महत्व अधिक आहे. Deputy Chief Minister of Maharashtra Ajit Pawar Marathwada Tour

काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे काही दिवसांपूर्वीच झाले होते दौरे

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत (congress minister nitin raut) आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (shivasena leader chandrakant patil) या दोघा नेत्यांनी अनेक दौरे केले होते. या नेत्यांचे दौरे संपताच अजित पवार यांनी आपले दौरे आखायला सुरुवात केल्याने अजित पवार यांच्या दौऱ्याला राजकीय वळण मिळत आहे.

खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड परस्थितीचा आढावा घेण्याच्या कारणाने अजित पवार यांचा दौरा

अजित पवार बीडमध्ये १० वाजून १५ मिनिटांनी येणार असून, बीड जिल्ह्यातील कोरोना परस्थितीचा आढावा घेणार असून, त्याचबरोबर जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, दौऱ्याचा शासकीय कार्यक्रम अद्याप आला नसला तरी शुक्रवारच्या दौऱ्याच्या तयारीची लगबग सुरू आहे.

असा आहे अजित पवार यांचा मराठवाडा दौरा 

देवगिरी

सकाळी मोटारीने प्रयाण

सकाळी ६ वाजून ४० मिनिट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई विमानतळ येथे आगमन

शासकीय विमानाने प्रयाण

औरंगाबाद विमानतळ येथे आगमन नंतर

मोटारीने प्रयाण

०८.४५ महाकाळ. ता.अबंड, जि. जालना येथे आगमन

०८.४५ राखीव (मा.ना.श्री. राजेश टोपे, मंत्री)

०९.१५

मोटारीने प्रयाण

१०.००

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आगमन

१०.१५ १) बीड जिल्हयातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा

२) बीड जिल्हा-खरीप हंगाम आढ़ावा (जिन्हाधिकारी, बीड)

(श्री. मच्छिद्र सुकते, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड - ८४५९१८२९७५)

१२.४५

मोटारीने प्रयाण

दुपारी १२.४५ गिरोली, ता.भूम, जि.उस्मानाबाद येथे आगमन

१२.४५ ते ०१`.४५ राखीव (श्री. राहुल मोटे, माजी आमदार - ९०२१९४३११७)

मोटारीने प्रयाण

०२.४५

जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आगमन

०३.००

१ )उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा

२) उस्मानाबाद जिल्हा-खरीप हंगाम आढावा (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)

(श्री.शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद - ९४२३७७७५६५)

०४.३०

पत्रकार परिषद

सायं. ०५.१५

मोटारीने प्रयाण

०६.१५ सोलापूर विमानतळ येथे आगमन

०६.३० शासकीय विमानाने प्रयाण

०७.१० पुणे विमानतळ येथे आगमन

नंतर

मोटारीने प्रयाण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी