Bharat Jodo Yatra 'भारत जोडो' यात्रेमध्ये देशमुख बंधू गैरहजर, प्रकाश आंबेडकरांचे भाकीत खरे ठरणार?

Deshmukh brothers did not turn to Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra ; काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांना टोला लगावला होता.

 Deshmukh brothers of Latur absent in 'Bharat Jodo' yatra
'भारत जोडो' यात्रेमध्ये लातूरचे देशमुख बंधू गैरहजर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लातूरच्या देशमुख बंधूंची गैरहजेरी
  • अमित देशमुख, धीरज देशमुख पदयात्रेला फिरकले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
  • हिंगोली जिल्ह्यात यात्रा आल्यानंतर देशमुख बंधू सहभागी होणार - सूत्रांची माहिती

लातूर : नांदेड जिल्ह्यात (Nanded District) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आली आहे. परंतु या यात्रेकडे लातूर जिल्ह्यातील (latur District) काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh ) आणि त्यांचे आमदार बंधू धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) हे अद्याप फिरकलेले नाहीत. देशमुख बंधू राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला फिरकले नसल्याने अनेक तर्क–वितर्क लावले जात आहेत. (Deshmukh brothers of Latur absent in 'Bharat Jodo' yatra,Will Prakash Ambedkar's prediction come true?)

कॉंग्रस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची देशात चर्चा सुरू आहे. या यात्रेत राज्यातीलचं नव्हे तर देशातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होत आहेत. मात्र, नांदेडच्या शेजारीच असलेल्या लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, त्यांचे आमदार बंधू धीरज देशमुख हे अद्याप भारत जोडो यात्रेला जुडलेले नाहीत. यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा : चंद्रग्रहणामुळे भूकंप? काय आहे ग्रहण आणि भूकंपाचं कनेक्शन?

लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा धम्म मेळावा झाला होता. या मेळाव्यात आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांना टोला लगावला होता. दरम्यान, आता राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होऊन या यात्रेला तीन दिवस झाले आहेत. तरीदेखील या यात्रेला देशमुख बंधू सहभागी झाले नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी केलेले भाकीत खरे तर ठरत नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा ; ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, राऊतांना जामीन 

हिंगोली जिल्ह्यात सहभागी होणार देशमुख बंधू

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसात राहुल गांधी यांची यात्रा हिंगोली जिल्ह्यात येणार आहे. राहुल गांधी यांच्या पुढील हिंगोली यात्रेची सर्व जबाबदारी देशमुखांवर दिली गेली असल्याची माहिती आहे. देशमुख कुटुंबदेखील ही जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती मिळाली आहे. यात्रा जेव्हा हिंगोली जिल्ह्यात पोहचेल तेव्हा तिथे दोन्ही देशमुख बंधू हजेरी लावतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत एकीकडे राहुल गांधी हे भारत जोडोचा संकल्प घेऊन देशभरात पायपीट करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये बेबनाव आहे का हा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. 

अधिक वाचा ; फिफा वर्ल्डकप कधी-कुठे बघाल, किती संघ आणि ग्रुप जाणून घ्या..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी