पूजा चव्हाण प्रकरणावर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 15, 2021 | 17:40 IST

Dhananjay Munde's first reaction on Pooja Chavan case: आमच्या पूजाला स्ट्रेस येऊ शकतो असं पूजाचे वडील म्हणाले. तिला आणखी एक आजार होता त्यामुळेही ती टेन्शनमध्ये असायची. ती लग्नाला देखील आली होती - पूजाचे वडील

Dhananjay Munde's first reaction on Pooja Chavan case
पूजा चव्हाण प्रकरणावर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपने देखील या प्रकरणात उडी घेतली
  • गेल्या वेळी २५ लाखाचे नुकसान झाले आहे आणि आता देखील २० ते २५ लाखाचे नुकसान झाले - पूजाचे वडील
  • पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या - धनंजय मुंडे

औरंगाबाद :    बीड जिल्ह्यातील (beed district) परळी (parali) येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण (pooja chavan) या युवतीने पुण्यात आत्महत्या (suicide) केली असून, या आत्महत्या प्रकरणात राज्याचे मंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांचे नाव समोर आल्याने सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, सदर प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपने देखील या प्रकरणात उडी घेत संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी यांनी देखील (Dhananjay Munde) प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हंटल आहे की, पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या आहे. पुढे जाऊन या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतरचं अधिक बोलता येईल, अशी सावध भूमिका धनंजय मुंडें यांनी घेतली आहे.

पूजा चव्हाणच्या वडिलांनीही दिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाणच्या वडिलांचे नाव लहू चंदू चव्हाण असे आहे. त्यांनी माध्यमांशी केलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले, पूजा जाण्याचे आगोदरच आम्हाला दु:ख आहे. त्यातच “प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या दाखवत आहेत” आणि अशा बातम्या दाखवून ते जास्तच दु:ख देतात. मेन मुद्दा म्हणजे पोल्ट्रीचा आहे. गेल्या वेळी २५ लाखाचे नुकसान झाले आहे आणि आता देखील २० ते २५ लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्या पूजाला स्ट्रेस येऊ शकतो असं पूजाचे वडील म्हणाले. तिला आणखी एक आजार होता त्यामुळेही ती टेन्शनमध्ये असायची. ती लग्नाला देखील आली होती, मी तिला लग्न कधी करायचं विचारत होतो. मात्र, ती नाही पप्पा, मला खूप मोठ बनायचं आहे. मला लग्न आताच करायचं नाही, अशी म्हणायची.

 

देवेंद्र फडणवीसांनीही दिली प्रतिक्रिया?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, पोलिसांनी सदर प्रकरणात कारवाई केली पाहिजे मात्र ती होताना दिसत नाही. या क्लिप्स ज्या आहेत त्या फार क्लिअर आहेत आणि याच्या आधारावर पोलिसांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे. परंतु कुठल्यातरी दबावाखाली पोलीस आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सदर क्लिप्समधील आवाज कोणाचा आहे हा प्रश्न जो उपस्थित होत आहे. तर सर्वांना माहित आहे तो आवाज कोणाचा आहे. मात्र, पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे, परंतु पोलिसांकडून ते लपवलं जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई ही दबावाखाली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी