एकनाथ शिंदें विरोधात पोलिसात तक्रार, शिंदे गट जिल्हाप्रमुख आणि पोलिसात वाद, जिल्हाप्रमुख यांचा आरोप

Dispute between Shinde Group District Chief and Police ; पोलीस आणि जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यात झालेल्या वादानंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी पोलिसावर आरोप केला करत म्हटलं आहे की, शिंदे यांच्यावर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मला बोलावून. पोलिसांनी बोलावल्याप्रमाणे मी पोलीस ठाण्यात आलो मात्र, पोलिसांनी मला इथ बोलावून घेत अपशब्द वापरले असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे.

Dispute between Shinde Group District Chief and Police
शिंदे गट जिल्हाप्रमुख आणि पोलिसात वाद,जिल्हाप्रमुखांचा आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिंदे यांच्या विरोधात औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसात सदर तक्रार दाखल करण्यात आली
  • जंजाळ यांच्यासह जवळपास १०० पेक्षा जास्त  शिंदे समर्थक पोलीस ठाण्यात जमले
  • पोलिसांनी बोलावून अपशब्द वापरला – जंजाळ

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. शिंदे यांच्या विरोधात औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसात सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री दहानंतर मुख्यमंत्र्यांची शहरातील क्रांती चौकात घेतलेल्या सभेवरून सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना बोलावून घेतले होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पोलीस निरीक्षक यांच्यात वाद झाला असल्याचे पहायला मिळाले आहे.

अधिक वाचा : शिंदे गटावर टांगती तलवार कायम, उद्या होणार सुनावणी

जंजाळ यांच्यासह जवळपास १०० पेक्षा जास्त  शिंदे समर्थक पोलीस ठाण्यात जमले

मिळालेय माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात रात्री लाऊडस्पीकरचा वापर केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीनंतर शिंदे गट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. पोलिसांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. यावेळी शिंदे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारीवरून शिंदे गट जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पोलीस निरिक्षकात आज वाद झाल्याचे पाहायला मिळाले. जंजाळ यांच्यासह जवळपास १०० पेक्षा  शिंदे समर्थक पोलीस ठाण्यात जमले असल्याचे पाहायला मिळाले. 

अधिक वाचा ; South Cinema: महेश बाबूची लवकरच Bollywood मध्ये एन्ट्री

पोलिसांनी बोलावून अपशब्द वापरला – जंजाळ

दरम्यान, पोलीस आणि जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यात झालेल्या वादानंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी पोलिसावर आरोप केला करत म्हटलं आहे की, शिंदे यांच्यावर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मला बोलावून. पोलिसांनी बोलावल्याप्रमाणे मी पोलीस ठाण्यात आलो मात्र, पोलिसांनी मला इथ बोलावून घेत अपशब्द वापरले असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे.

रात्री १० वाजल्यानंतरही लाऊडस्पीकर सुरू ठेवत भाषण केल्याने करण्यात आली शिंदे विरोधात तक्रार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात औरंगाबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री १० वाजल्यानंतरही लाऊडस्पीकर सुरू ठेवत भाषण केल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा : शिवसेना संपविण्याचा डाव समोर आला - उद्धव ठाकरे  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसआधी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला तसेच इतरही त्यांचे कार्यक्रम पार पडले. याच दरम्यान ३१ जुलै रोजी सिल्लोड येथील सभा संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या इतर कार्यक्रमांना उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लाऊडस्पीकरवर भाषण सुद्धा यावेळी त्यांनी केले. रात्री १० वाजल्यानंतर लाऊडस्पीकर लावण्यास तसेच भाषणास परवानगी नाहीये मात्र, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी