'आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ अभियानाला मोठे यश, १४१ नव्या उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

District Industries Center approves 141 new entrepreneurs : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर यांच्या सहकार्याने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

District Industries Center approves 141 new entrepreneurs
१४१ नव्या उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या योजने अंतर्गत स्वगुंतवणुक केवळ ५% ते १०% असुन १५% ते ३५% पर्यंत अनुदान मिळते
  • आजवर ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद प्राप्त झाली असुन २४० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत
  • आजवर ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद प्राप्त झाली असुन २४० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत

उस्मानाबाद :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन उस्मानाबाद जिल्ह्यात बुथ तेथे उद्योग/ व्यवसाय हा उपक्रम राबविण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला होता. या ‘आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद व मोठे यश मिळत असुन आजवर १४१ नव उद्योजकांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या मान्यतेसह बँकेकडे दाखल झाले आहेत.

३५ टक्क्यांपर्यंत पर्यंत अनुदान 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर यांच्या सहकार्याने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम व उद्योगासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या योजने अंतर्गत स्वगुंतवणुक केवळ ५% ते १०% असुन १५% ते ३५% पर्यंत अनुदान मिळते. ५० लाखा पर्यंतचे प्रकल्प या योजने अंतर्गत सुरु करता येत असुन त्यासाठी किमान शैक्षणीक अहर्ता ८ वी पास अशी आहे. रुपये १० लाखापर्यंत विना तारण कर्जाची सोय या योजने अंतर्गत आहे. यामध्ये लहान मोठे १५० पेक्षा जास्त उद्योग अंतर्भुत आहेत. 

४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातुन उत्तम प्रतिसाद मिळत असुन यामध्ये अर्ज केलेले दाळ उद्योग, लाकडी तेल घाणा, सुगंधीत तेल उत्पादन, अगरबत्ती उत्पादन, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, फॅब्रीकेशन, मत्स्य पालन, दुग्ध्द प्रक्रीया उद्योग, खवा उद्योग अशा व इतर उद्योगांची नोंदणी झाली आहे. आजवर ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद प्राप्त झाली असुन २४० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत व त्यापैकी १४१ प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रातुन मंजुर करुन बँकेकडे पाठविण्यात आले आहेत व त्याचा पाठपुरावा चालु आहे. आवडीचा उद्योग/ व्यवसाय सुरु करुन आपला युवक आत्मनिर्भर व्हावा व याच माध्यमातुन आपला जिल्हा आत्मनिर्भर व्हावा असा मानस व्यक्त करत योजनेचे यश पाहुन जिल्हातील अधिकाधिक युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी