तुळजाभवानी देवीच्या कपाळावर डॉक्टरचा लोगो, 'हे' आहे कारण, नक्की वाचा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 03, 2021 | 18:36 IST

Doctor's logo on the forehead of Tulja Bhavani Devi : जगावरील कोरोना रुपी संकट दूर व्हावे यासाठी यावेळी तुळजाभवानी देवीच्या मस्तकी (कपाळावर) डॉक्टर यांचा लोगो ( चिन्ह) हळदी कुंकवात काढण्यात आला आहे.

Doctor's logo on the forehead of Tulja Bhavani Devi
तुळजाभवानी देवीच्या कपाळावर डॉक्टरचा लोगो, 'हे' आहे कारण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सणवारानुसार व प्रासंगिक संदेश देणारी आकर्षक चिन्ह महंत व पुजारी नियमित काढतात
  • संकटात मुक्तीसाठी देवीला आज डॉक्टर रुपात सजविण्यात आले
  • तुळजाभवानी देवीचे मंदिर सध्या बंद असून भक्तांना ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धन्वंतरी रुपात विशेष पुजा करण्यात आली आहे.  जगावरील कोरोना रुपी संकट दूर व्हावे यासाठी यावेळी तुळजाभवानी देवीच्या मस्तकी (कपाळावर) डॉक्टर यांचा लोगो ( चिन्ह) हळदी कुंकवात काढण्यात आला आहे. देवीला डॉक्टर रुपात पुजा करून कोरोना मुक्तीची प्रार्थना करण्यात आली व साकडं घालण्यात आले आहे.

सणवारानुसार व प्रासंगिक संदेश देणारी आकर्षक चिन्ह महंत व पुजारी नियमित काढतात

तुळजाभवानी देवीची सकाळी व रात्री प्रक्षाळ पूजेवेळी कपाळी वेगवेगळी चिन्ह हळदी कुंकवाचा वापर करून दररोज २ वेळा काढली जातात यामुळे देवीचे रूप आकर्षक दिसते व रोज अभिषेक, पूजा , आरती केली जाते असे महंत तुकोजीबुवा यांनी सांगितले. तुळजाभवानी देवीची दररोज पूजा करताना देवीच्या मस्तकी कपाळी हळदी कुंकवाने विविध प्रकारचे चिन्ह काढले जातात यात कधी ओम,श्री, कमळ, त्रिशूल, स्वस्तिक , सूर्य, शंख , मोर या हिंदू प्रतिक आणि धार्मिक चिन्हासह इतर सणवारानुसार आणि प्रासंगिक संदेश देणारी आकर्षक चिन्ह महंत व पुजारी नित्य नियमित काढत असतात. 

संकटात मुक्तीसाठी देवीला आज डॉक्टर रुपात सजविण्यात आले

उस्मानाबाद जिल्ह्यासह जगभरात कोरोनाने थैमान घातले असून हे संकट देवीने तुळजाभवानी देवीने धन्वंतरी रुपात डॉक्टर बनून दूर करावे अशी प्रार्थना करण्यात आली , ज्या वेळी मानवावर संकट आले त्यावेळी तुळजाभवानी देवीने त्यांच्या हाकेला धावुन संकटमुक्ती केली त्याचप्रकारे या कोरोना संकटात मुक्तीसाठी देवीला आज डॉक्टर रुपात सजविण्यात आले असल्याचे महंत तुकोजी बुवा यांनी सांगितले.

तुळजाभवानी देवीचे मंदिर सध्या बंद असून भक्तांना ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे

कोरोना संकटामुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर सध्या बंद असून भक्तांना ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे, तुळजाभवानी देवीच्या या धन्वंतरी रूपातील दर्शन अनेक भक्तांनी फोटो व ऑनलाईन माध्यमातून घेतले आणि प्रार्थना केली, संकट दूर व्हावे यासाठी आज देवीची धन्वंतरी रुपात पूजा करण्यात आली असे मंदिर संस्थांनच्या तहसीलदार योगीता कोल्हे यांनी सांगितले.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थिती - 

उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ हजार ६७० रुग्ण बरे झाले असून ८०.६३ टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर ९५० रुग्णांचा मृत्यू झाला असून २.३७ टक्के मृत्यू दर आहे. जिल्ह्यात आजवर २ लाख २४ हजार ३९४ नमुने तपासले त्यापैकी ३९ हजार ५०१ रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर ३०.४५ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ८८१ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी