Raj Thackeray : औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा होणार आहे. ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेची जय्यत तयारी देखील सुरु आहे. मात्र, ही सभा होते कि नाही अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. कारण वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील होणाऱ्या सभेला विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अश्या मागणीचे पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. दरम्यान,राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काल सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असला तरी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मुस्लीम समाजाचा रमाजानचा पवित्र महिना सुरु असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत आहे.
अधिक वाचा : आयआयटीमधील वास्तव...पाहा प्रयोगशाळेतील विद्यार्थ्याचा फोटो
अधिक वाचा : हा शेअर 27 पैशांवरून पोचला 30 रुपयांवर, करोडोंची कमाई
मनसे अध्यक्ष राज ठकारे यांची सभा औरंगाबाद येथे होणार असून, मनसेने रितसर पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. मनसेने दिलेल्या निवेदनानुसार राज ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाचा आढावा पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षक यांनी घेतला असला तरी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यातचं या ५ संघटनांनी दिलेल्या निवेदनामुळे सभा होणार की, नाही असा प्रश निर्माण होत आहे.
अधिक वाचा ; बापरे! उडत्या विमानाचा अचानक उघडला दरवाजा...मग जे झाले