AURANGABAD | डबल मर्डर केसने औरंगाबाद हादरले, पती-पत्नीची अज्ञातांनी केली हत्या

आज सोमवार 23 मे रोजी औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरात, एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

Double murder case shakes Aurangabad, husband and wife murdered by unknown persons
डबल मर्डर केसने औरंगाबाद हादरले 
थोडं पण कामाचं
  • आज सोमवार 23 मे रोजी औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरात,
  • एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
  • एकाच घरात दोन जणांची हत्या झाल्याची घटना आज रोजी उघड झाली आहे.

औरंगाबाद :  आज सोमवार 23 मे रोजी औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरात, एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकाच घरात दोन जणांची हत्या झाल्याची घटना आज रोजी उघड झाली आहे. (Double murder case shakes Aurangabad, husband and wife murdered by unknown persons)

औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर भागात पती-पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी शहरात भरदिवसा तरुणीला ओढून नेत तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता या दांपत्याच्या हत्येने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. सदरील घटनेत  शामसुंदर हिरालाल कलंत्री (वय.५५) आणि किरण शामसुंदर कलंत्री (वय.४५) असे मृत दांपत्याचे नाव असून, अज्ञात मारेकर्‍यांनी या दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

एका मृतदेहावर मारहाण केल्याच्या जखमा दिसून येत असून, तर सदरील महिलेचा मृतदेह मुलांच्या बॉक्समध्ये आढळून आला आहे, पहिल्या मजल्यावर एक मृतदेह आणि दुसऱ्या मजल्यावर ती एक मृतदेह असे दोन मृत्यूदेह पोलिसांना आढळून आले आहेत, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी आज रोजी दिली आहे.

दिवसेगणिक वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या सत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरात खुनाची सत्र सुरूच असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आज रोजी निर्माण झाली आहे.पुंडलिक नगर डबल मर्डर केस प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी