मोठी बातमी ; नवाब मालिकांना मोठा धक्का,उस्मानाबादेतील तब्बल दीडशे एकर जमीन जप्त

औरंगाबाद
Updated Apr 13, 2022 | 19:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

ed big action on nawab malik osmanabad 150 acres of land : उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीन ही नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने आहे. मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या व्यक्तींच्या  नावाने मलिक जमीन खरेदी केली होती. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करित जप्तीची कारवाई असल्याची माहिती मिळत आहे.

ed big action on nawab malik osmanabad 150 acres of land
मालिकांना मोठा धक्का,उस्मानाबादेतील तब्बल १५० एकर जमीन जप्त   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १५० एकर जमीन ईडीने जप्त
 • नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीन
 • कागदोपत्री २ कोटी ७ लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद

उस्मानाबाद : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचर नेते नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १५० एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नवाब मलिक यांच्या तब्बल ५ संपती आज ईडीने जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमाले जवळा येथे असलेली १५० एकर जमीन ईडीने केली केली आहे. जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून जमीन खरेदी केली शिवाय मलिक हे शेतकरी नसताना त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ही जमीन खरेदी केली असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला होता.

अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर मराठी शुभेच्छा

नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीन

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीन ही नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने आहे. मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या व्यक्तींच्या  नावाने मलिक जमीन खरेदी केली होती. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करित जप्तीची कारवाई असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा : घर, मंदिरात संध्याकाळी करताय पुजा? या गोष्टी ठेवा लक्षात

कागदोपत्री २ कोटी ७ लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद

सदर जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन १ कोटी २० लाखाने कमी केले असून, कागदोपत्री २ कोटी ७ लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. १५० एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे.

अधिक वाचा : डॉ. बाबासाहेबांची 11 गीत, ऐकून अंगावर येतील शहारे 

नवाब मलिक यांच्या कडून झालेल्या जमीन खरेदी बाबत भाजपने काही खुलासा केला आहे

 1. मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम व त्याच्या टोळीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासी यंत्रणांना दाऊद टोळीने कुर्ला, मुंबई येथील रु.३०० कोटी रुपयांचा भूखंड बळकावल्याचा गुन्हा आला व त्यामध्ये आरोपी नवाब मलिक यांचा सहभाग आढळला.
 2. दाऊदची बहीण हसिना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, बॉम्बस्फोटा बद्दल सध्या शिक्षा भोगत असलेला सरदार खान आणि नवाब मलिक यांनी संगनमताने कुर्ला येथील मुनीरा पटेल यांचा भूखंड बळकावला, तो नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचे चित्र निर्माण केले, नवाब मलिक यांनी भूखंड ही गुन्हयातील मालमत्ता आजपर्यंत बाळगली व तिचा वापर केला असा आरोप आहे.
 3. जमिनीचा जो व्यवहार झाला तो एका ट्रॅव्हल एजंटच्या ऑफिस मध्ये झाला, तेथे खुद नवाब मलिक व हसीना पारकर समक्ष बैठकीसाठी उपस्थित होते.
 4. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने मुंबईतील कुर्ला येथील मुनिरा प्लंबर व तिच्या आईच्या मालकीची सर्वे क्र. ३३६, ३३६/१ ते ५, ३३८ ही जमीन बळकावण्याचा कट रचला. त्या जमिनीवर आरोपी नवाब मलिक यांचे कुर्ला जनरल स्टोअर एका ठिकाणी होते.
 5. आरोपी नवाब मलिक यांनी हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी संगनमत करून बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा मिळवला. यामध्ये आरोपी नवाब मलिक यांनी बेकायदेशीररित्या पैसे दिले व या संपत्तीची पूर्ण मालकी मिळवली,
 6. सलीम पटेल हा हसिना पारकरचा ड्रायव्हर होता व त्याचा वापर करून अनेक गुन्हे केले गेले. सरदार खान हा मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
 7. सलीम पटेल याने जमीनमालक मुनीरा प्लंबर हिच्याकडून पॉवर ऑफ अटर्नि घेऊन तिला एकही पैसा न देता जमीन बळकावली व पुढे व्यवहाराचा गुंता करून ही जमीन आरोपी नवाब मलिकांनी ताब्यात घेतली व ती त्यांच्या ताब्यात आजही आहे.
 8. या पूर्ण विषयाचे गांभीर्य या कारणामुळे वाढला आहे की, हसीना पारकर या दाउद च्या बहिण आहेत. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कागदोपत्री लाखात घेण्यात आली. काही व्यवहार रोकड स्वरूपात झाला. जमिनीच्या मूळ मालकाची सहमती या व्यवहारासाठी घेतली गेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी