उस्मानाबाद जिल्ह्यात ईडीची मोठी कारवाई, तब्बल 'एवढ्या' कोटीची मालमत्ता जप्त

ED has taken major action in Osmanabad district : मनी लॉंड्रीन्ग कायद्या २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झाली असून ३१ मार्च २०२१ पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले होते अशी देखील माहिती समोर आली आहे. कंपनी कायद्यातर्गत ही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ५ मार्च २००९ रोजी नोंदणी  केली आहे.

ED has taken major action in Osmanabad district
उस्मानाबाद जिल्ह्यात ईडीची मोठी कारवाई, तब्बल 'एवढ्या' कोटीची मालमत्ता जप्त  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ईडीने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर कारवाई केली आहे
  • मनी लॉंड्रीन्ग कायद्या २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली
  • कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे

उस्मानाबाद  -  गेल्या काही महिन्यांपूर्वीच ईडीने उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची तब्बल १५० एकर जमीन जप्त केली होती. त्यानंतर आता ईडीने पुन्हा जिल्ह्यातील एका कंपनीवर कारवाई केली आहे. काही महिन्यातच ईडीने केलेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची ४५.५० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे अशी माहिती ईडीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सदर कंपनी ही कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे यांच्या मालकीची असल्याचे बोलले जात आहे. सदर कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे तर गेली ५ ते ६ वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

अधिक वाचा ; मुख्यमंत्री आता 'या' परवानगी नंतरच विठूरायाची पूजा करू शकणार

मनी लॉंड्रीन्ग कायद्या २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉंड्रीन्ग कायद्या २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झाली असून ३१ मार्च २०२१ पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले होते अशी देखील माहिती समोर आली आहे. कंपनी कायद्यातर्गत ही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ५ मार्च २००९ रोजी नोंदणी  केली आहे. त्यानुसार १५ कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे तर पेड कॅपिटल हे २ कोटी आहे.

अधिक वाचा : अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा 

कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता

सदर कंपनीचा नोंदणी क्रमांक देखील समोर आला आहे. १३३६०२ हा कंपनीचा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा या कंपनीचा उद्देश आहे. सदर कंपनी सध्या उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सद्या बंद स्थितीत आहे. कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता असल्याचही समोर आले आहे.

अधिक वाचा : पोलिसांची मोठी कारवाई, डांबून ठेवलेल्या ५० जनावरांची सुटका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी