Accident News लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा घडला भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर

Eicher-Car met with a terrible accident in latur ; आयशर टेम्पो हा भरधाव वेगात आला होता. आयशर भरगाव वेगात असल्याने त्याला वेग सांभाळता आला नसल्याने त्याने थेट कारला जोराची धडक दिली. आयशर आणि कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चारजण हे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Eicher-Car met with a terrible accident in latur
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा घडला भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात घडला
  • या अपघतात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली
  • सदर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

लातूर : राज्यात अपघाताचे सत्र काही थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात होणाऱ्या अपघाताचा आकडा देखील मोठा आहे. दरम्यान,  लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि  आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.

अधिक वाचा ; वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, PAK क्रिकेटरने केली कमेंट

या अपघतात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो हा भरधाव वेगात आला होता. आयशर भरगाव वेगात असल्याने त्याला वेग सांभाळता आला नसल्याने त्याने थेट कारला जोराची धडक दिली. आयशर आणि कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चारजण हे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. उदगीरमधील काहीजण एम.एच 13 सीएस 9955 क्रमांकाच्या कारने लातूरला मुलगी पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी ते लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी पाटीजवळ येताच समोरून एम.एच 49 एल 4377 या क्रमांकाच्या आयशरने जोरदार धडक दिली अशी माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली आहे.

अधिक वाचा ; देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी 

जखमींना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे

जखमींना उपचारासाठी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. जखमींचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातात उदगीरमधील समता नगरमधील रहिवासी तानाजी कुमदाळे आणि अन्य एक जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, नेमकी चूक कोणाची होती? याचा तपास पोलीस करत आहेत.  

अधिक वाचा ; मारुतीच्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी